Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींना सोडावं लागलं सिंगापूर, गोटाबाया राजपक्षे यांचा आता 'या' देशात आश्रय
Gotabaya Rajapaksa in Thailand : श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांना सिंगापूरही सोडावं लागलं आहे, मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्यांनी थायलँडमध्ये आश्रय घेतला आहे.
Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी श्रीलंकेतून पलायन करत सिंगापूरमध्ये (Singapore) आश्रय घेतला होता. मात्र आता राजपक्षे यांना कायदेशीर कारणांमुळे सिंगापूरही सोडावं लागलं आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, गोटाबायो राजपक्षे यांनी सिंगापूर देश सोडला आहे. राजपक्षे यांचा सिंगापूर येथे राहण्यासाठीचा व्हिसा संपल्यामुळे आता त्यांनी सिंगापूर देशातून रवाना झाले. गोटाबायो राजपक्षे यांनी गुरुवारी सिंगापूर सोडून थायलँडमध्ये (Thailand) पोहोचले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, राजपक्षे यांनी सिंगापूरहून बँकाककडे विमानानं रवाना झाले. याच्या एक दिवस आधी थायलँड सरकाराने म्हटलं होतं की, श्रीलंकन सरकारकडून राजपक्षे यांच्या थायलँड दौऱ्याच्या परवानगीसाठी विनंती करण्यात आली होती. थायलँडमध्ये वास्तव्यास असताना राजपक्षे पुढील आश्रयासाठी तयारी करतील.
सिंगापूर आधी मालदीवमध्ये मुक्काम
गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा ई-मेलद्वारे श्रीलंकन संसदेच्या अध्यक्षांना पाठवला. गोटाबाया राजपक्षे श्रीलंका सोडून मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर ते सिंगापूरला पोहोचले. त्यानंतर आता त्यांनी थायलँडमध्ये आश्रय घेतला आहे. दरम्यान सिंगापूर सरकारने गोटाबाया राजपक्षे खासगी भेटीवर आल्याचे म्हटलं. सिंगापूर सरकारने म्हटले आहे की, गोटाबाया यांनी आमच्याकडे आश्रय मागितला नाही. तसेच आम्हीही त्यांना आश्रय दिला नाही.
श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती बिकट, उपासमारीची वेळ
श्रीलंका इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सध्या श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र आहे. देशात इंधनासह खाद्यपदार्थांचाही तुटवडा (Food Crisis) निर्माण झाला आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंची मोठी कमतरता जाणवत आहे. श्रीलंकेमध्ये सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अन्नापासून ते स्वयंपाकाचा गॅस, औषध आणि अगदी टॉयलेट पेपरसारख्या वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Gotabaya Rajapaksa Resigns: गोटाबाया राजपक्षे यांनी ईमेलद्वारे दिला श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा, मालदीवनंतर सिंगापूरला पोहोचले
- Sri Lanka Crisis : श्रीलंकेत उपासमारीची वेळ, या परिस्थितीत फक्त भारताचा मदतीचा हात
- Sri Lanka Crisis: भारतासाठी श्रीलंका भौगोलिकदृष्ट्या कसा महत्त्वाचा? भारतानं त्याला कसा प्रतिसाद दिला?