Salman Rushdie : मोठी बातमी! सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला, न्यूयॉर्क येथे घडली घटना
Salman Rushdie attack : सलमान रश्दी यांच्यावर झालेला हा प्राणघातक हल्ला न्यूयॉर्क येथे झाला आहे.
Author Salman Rushdie attack : जगविख्यात लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये नुकताच हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना चाकूने वार करून जखमी करण्यात आलं आहे. लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे हल्ला झाला आहे. दरम्यान काही प्रत्यक्षदर्शीने सलमान रश्दी यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याचे ट्वीट केले असून एक घटनास्थळाचा व्हिडीओही यावेळी पोस्ट करण्यात आला आहे. दरम्यान सुरक्षा दलांनी हल्लेखोराला पकडण्यापूर्वी रश्दी यांच्यावर अनेक वेळा वार करण्यात आले होते. त्यानंतर प्रेक्षकांमधील काही सदस्य मंचावर देखील गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सलमान रश्दी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान न्यूयॉर्कच्या गव्हर्नर यांनी सलमान हे जिवंत असून त्यांच्यवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती दिली आहे.
Salman Rushdie attacked on stage; New York Governor says he is alive, taken to hospital
— ANI Digital (@ani_digital) August 12, 2022
Read @ANI Story | https://t.co/vykhkR5Dek#SalmanRushdie #NewYork pic.twitter.com/ABB3lBDlQ4
न्यूयॉर्कमधील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असून त्यात ते जखमी झाले आहे. शुक्रवारी सकाळी व्याख्यान देण्यापूर्वी CHQ 2022 कार्यक्रमाच्या मंचावर असताना 75 वर्षीय सलमान रश्दी यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मिडनाईट्स चिल्ड्रन (Midnight's Children) तसंच द सॅटेनिक व्हर्सेस (The Satanic Verses) ही सलमान रश्दी यांची गाजलेली पुस्तकं आहेत.
Author Salman Rushdie, whose writing led to death threats from the Islamic regime in Iran, has been attacked on stage at an event in western New York. pic.twitter.com/iM3tDEI7mF
— Asaad Sam Hanna (@AsaadHannaa) August 12, 2022
'द सॅटेनिक व्हर्सेस' या पुस्तकामुळे वादात
सलमान रश्दी हे एक जागतिक किर्तीचे लेखक असून बुकर पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांनी लिहिलेल्या द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. 1980 च्या दशकात सलमान यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमुळे वाद ओढावला होता. खासकरुन मुस्लिम समाजात त्यांच्या या पुस्तकामुळे वाद झाला होता. दरम्यान द सॅटॅनिक व्हर्सेस आणि मिडनाईट चिल्ड्रन यांसारख्या पुस्कांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रश्दी यांच्यासाठी एका धार्मिक नेत्याने त्यांच्या हत्येचा फतवा देखील काढला होता.
कोण आहेत सलमान रश्दी?
भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. त्यांची पहिली कादंबरी 1975 मध्ये आली. त्यांना त्यांच्या मिडनाइट्स चिल्ड्रन (1981) साठी बुकर पारितोषिक देखील मिळाले. ही कादंबरी आधुनिक भारताबद्दल आहे. त्यांचं चौथं पुस्तक, द सॅटॅनिक व्हर्सेसमुळे (1988) त्यांना वादात अडकावे लागले होते. सलमान रश्दी यांना त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तका त्यांना अनेक धमक्या देखील आल्या आहेत. या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पुस्तकात इस्लाम धर्माची निंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या वादानंतर आलेल्या धमक्यांना न जुमानता त्यांनी 1990 च्या दशकात अनेक कादंबऱ्या लिहिल्या. 2007 मध्ये इंग्लंडच्या राणी दुसरी एलिझाबेथ यांनी त्यांना साहित्य क्षेत्रातील सेवांसाठी 'सर' ही पदवी प्रदान केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या-