Iran Israel Conflict : दुबई-अबू धाबीवर इराणचा हल्लाबोल, जगातील उंच इमारत निशाण्यावर, बुर्ज खलिफा इमारत रिकामी केली
US-Israel Iran War : अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यानंतर इराणने जोरदार पलटवार केला असून अमेरिकेचे मित्र राष्ट्र समजल्या जाणाऱ्या यूएई, कुवेतसह अनेक देशांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे.

US-Israel Iran War : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त एअर स्ट्राइक करत त्याच्या 30 हून अधिक शहरांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर इराणने ‘ऑपरेशन फतह-ए-जंग’ अंतर्गत पश्चिम आशियातील 8 पेक्षा अधिक देशांवर क्षेपणास्त्र हल्ले करत पलटवार केला आहे. इराणच्या हल्ल्यातून दुबई आणि अबू धाबी देखील सुटलं नाही. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफाजवळही इराणने अणवस्त्राचा हल्ला केल्याची माहिती आहे. त्यामुळे पर्यटकांना आणि रहिवाशांना बाहेर काढून ही इमारत आता रिकमी करण्यात आल्याची माहिती आहे.
Dubai Explosion Update : दुबईतील स्फोट आणि हॉटेलवर हल्ला
दुबईतील पाम जुमेराह परिसरातील Fairmont The Palm या सुप्रसिद्ध हॉटेलवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याचे दिसत आहे. आकाशात धुराचे प्रचंड लोट उसळताना दिसत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा स्फोट झाल्यानंतर ‘द पाम’ परिसरातून धूर उसळताना दिसला. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा दाखल झाल्या आहेत.
Burj Khalifa Evacuated : बुर्ज खलिफा रिकामी
दुबईतील जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा येथील नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. शहरातील नागरिकांनी आकाशात क्षेपणास्त्रे वेगाने जाताना पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. दुबई, जे पश्चिम आशियातील प्रमुख व्यापारी केंद्र मानलं जातं, त्या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Iran Counter Attack : इराणचा पलटवार
शनिवारी सकाळी इराणची राजधानी तेहरानवर अमेरिका-इस्रायलने संयुक्त हल्ला केला. त्यानंतर इराणने आखाती परिसरातील अनेक देशांवर प्रत्युत्तरादाखल क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यामुळे अनेक देशांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आल्या.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने सर्व उड्डाणे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. संयुक्त अरब अमिरातने अबू धाबीमध्ये एका नागरिकाच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तर कतार, बहरेन, कुवैत आणि सौदी अरेबिया यांनी क्षेपणास्त्रे अडवण्यात यश आल्याची माहिती दिली आहे.
इस्रायलमध्ये अनेकदा सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडीओमध्ये दुबईतील पर्यटक पूल परिसरातून घाबरून पळताना दिसत आहेत.
ही बातमी वाचा:
























