एक्स्प्लोर

Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?

ट्रम्प 2016 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आणि 2020 मध्ये जो बिडेन यांच्याकडून पराभूत झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर 4 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनलेले ट्रम्प हे पहिलेच आहेत.

Donald Trump : 2020 मध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर आणि अमेरिकन संसदेत केलेल्या हिंसाचारानंतर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प (Republican presidential candidate Donald Trump) यांनी 1932 नंतर दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची (US Election Result 2024) निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे कमला हॅरिस यांना शर्थीचे प्रयत्न  करूनही पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचे त्यांचे यंदा तरी हुकले आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. त्यांना 538 पैकी 277 जागा मिळाल्या आहेत. त्यांच्याकडे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 270 जागांपेक्षा 7 जास्त आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना कडवी झुंज देऊनही केवळ 224 जागा जिंकता आल्या आहेत. 

ट्रम्प 2016 मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष झाले आणि 2020 मध्ये जो बिडेन यांच्याकडून पराभूत झाले. ताज्या निकालानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर 4 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनलेले ट्रम्प हे पहिले राजकारणी आहेत. अध्यक्षीय निवडणुकीत दोनदा महिला उमेदवाराचा पराभव करणारे ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले नेते आहेत. 2016 आणि 2024 व्यतिरिक्त कोणत्याही महिलेने राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवलेली नाही. ट्रम्प यांनी दोन्ही वेळा निवडणुका जिंकल्या आहेत. ट्रम्प यांनी ट्विटरकडून त्यांच्या हिंसक भाषणामुळे आणि खोटारडेपणामुळे बॅन करण्यात आले होते. मात्र, टेस्ला प्रमुख एलाॅन मस्क यांनी ट्विटची मालकी आपल्याकडे घेतल्यानंतर ट्रम्प यांना ट्विटवर पुन्हा एन्ट्री दिलीच, पण त्यांच्या सक्रियपणे प्रचार सुद्धा केला. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर मस्क यांचा विशेष उल्लेख ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केला. यावरून मस्क यांचा ट्रम्प यांच्या विजयातील वाटा दिसून येतो.  

2020 मध्ये अमेरिकन संसदेत हिंसाचार

2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव अमान्य करत  2 हजारांहून अधिक लोकांचा जमाव अमेरिकन संसदेत घुसला. यातील अनेकांकडे शस्त्रे होती. ही तीच जागा होती जिथून काही मिनिटांपूर्वी अमेरिकन निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाला होता. हिंसक जमावाने कॅपिटल हिलमध्ये प्रवेश करताच, घाबरलेले खासदार जमेल तिथे लपले होते. हिंसक जमावाने संसदेला चार तास घेराव घातला. आंदोलक खासदारांच्या कार्यालयात घुसले. तेथे तोडफोड झाली. अमेरिकेच्या इतिहासात संसदेवर अशाप्रकारे हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ होती. ज्या व्यक्तीसाठी संसदेत ही दंगल घडत होती ती व्यक्ती दुसरी कोणी नसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते. जे निवडणुकीतील पराभवानंतर व्हाईट हाऊसच्या खासगी जेवणाच्या खोलीत बसून टीव्हीवर हे सर्व लाइव्ह पाहत होते. त्यांनी दावा केला की निवडणुकीत घोटाळा झाला आहे. या घटनेला जवळपास 4 वर्षे उलटून गेली आहेत, ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झाले आहेत. ट्रम्प यांनी नेहमीच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याचे म्हटले जाते.

'डोनाल्ड ट्रम्प सोन्याच्या चमच्याने जन्माला आले'

डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म 14 जून 1946 रोजी न्यूयॉर्क, अमेरिकेत झाला. त्यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला होता. ट्रम्प यांचे वडिल फ्रेड यांच्या पाच मुलांपैकी डोनाल्ड ट्रम्प चौथे आहेत. ट्रम्प हे त्यांचा भाऊ फ्रेड जूनियर आणि दोन बहिणींपेक्षा मोठे होते. याशिवाय एक भाऊ रॉबर्ट ट्रम्प त्यांच्यापेक्षा लहान होता. फ्रेड कठोर आणि शिस्तप्रिय वडील होते. आपल्या मुलांनीही मेहनती व्हावे आणि मोठी स्वप्ने पाहावीत अशी त्यांची इच्छा होती. त्यांचा मुलगा डोनाल्डबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता.

डोनाल्ड ट्रम्प आठव्या वर्षी करोडपती

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा 3 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांच्या व्यवसायातून वार्षिक $ 2 लाख कमावण्यास सुरुवात केली. ट्रम्प 8 वर्षांचे झाले तोपर्यंत ते करोडपती झाले होते. ट्रम्प अडीच वर्षांचे असताना त्यांची आई आजारी पडू लागली. यामुळे ट्रम्प यांच्या वडिलांचा त्यांच्या संगोपनावर मोठा परिणाम झाला. ट्रम्प यांची भाची मेरी सांगते की डोनाल्ड जेव्हा मोठा होत होता तेव्हा त्याला त्याच्या आईचे प्रेम मिळाले नाही. ट्रम्प यांचे चरित्रकार मार्क फिशर म्हणतात की जेव्हा जेव्हा कोणी ट्रम्प यांना विचारते की त्यांची आई त्याच्यावर कशी प्रेम करत होती, तेव्हा ट्रम्प यांच्याकडे उत्तर नसते.

पहिल्यापासून आक्रमक, भावाशी दादागिरी

ट्रम्प यांचे सातवीपर्यंत शिक्षण न्यूयॉर्क शहरात झाले. शालेय जीवनापासून ट्रम्प यांची वृत्ती आक्रमक आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलांना तो दादागिरी करत असे. याबाबत ट्रम्प यांच्या वडिलांकडे अनेकदा तक्रारी आल्या. ट्रम्प यांनी आपल्या भावाला घरीही दादागिरी करण्यास सुरुवात केली. यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला न्यूयॉर्क मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. ट्रम्प यांना वयाच्या 13व्या वर्षी लष्करी शाळेत जावे लागले. ट्रम्प यांचे चरित्रकार मार्क फिशर यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प मिलिटरी स्कूलमध्येही आपल्या वर्गमित्रांना ओरडायचे. वडिलांकडून मिळालेल्या संगोपनामुळे ट्रम्प स्वाभाविकपणे स्पर्धात्मक बनले होते. लष्करी शाळेतही त्यांची हीच वृत्ती होती. इथेही ते सगळ्यांशी स्पर्धा करत होते. 

गगनचुंबी इमारतींपासून ते कॅसिनोपर्यंत व्यवसाय

डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा मोठा भाऊ फ्रेड ज्युनियर यांच्या निर्णयामुळे सर्व प्रसिद्धी आणि वारसा मिळाला. ज्युनियरने वडिलांच्या व्यवसायात सहभागी होण्यास नकार दिला होता. तो पायलट झाला. त्यामुळे ट्रम्प कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी धाकटे भाऊ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आली. यावेळी ते अवघे 18 वर्षांचे होते. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीत येण्यापूर्वी त्यांच्या वडिलांनी त्यांना 1 मिलियन डॉलरचे कर्ज दिले होते. कंपनीत रुजू झाल्यानंतर ट्रम्प यांनी वडिलांना न्यूयॉर्क शहरातील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मदत करण्यास सुरुवात केली.

वयाच्या 25 व्या वर्षी 'द ट्रम्प ऑर्गनायझेशन'चे अध्यक्ष 

त्यांनी कंपनीचे नाव बदलून द ट्रम्प ऑर्गनायझेशन केले. वयाच्या 25 व्या वर्षी डोनाल्ड 'द ट्रम्प ऑर्गनायझेशन'चे अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यानंतर, ट्रम्प 1970 आणि 1980 च्या दशकात एक महत्त्वाकांक्षी रिअल इस्टेट व्यावसायिक म्हणून उदयास आले. ट्रम्प यांनी कंपनीला गृहनिर्माण प्रकल्प तसेच लक्झरी हॉटेल्स, कॅसिनो आणि गगनचुंबी इमारती उभारण्यात गुंतवले. 1976 मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनातील सर्वात मोठा निर्णय घेतला. त्याने न्यूयॉर्कमधील दिवाळखोर कमोडोर हॉटेल विकत घेतले आणि त्याच्या जागी एक आलिशान हॉटेल बांधण्यासाठी हयात समूहाशी करार केला. मात्र, त्यावेळी ट्रम्प यांच्याकडे यासाठी पुरेसा पैसा नव्हता. यावेळी त्यांनी वडिलांच्या राजकीय प्रभावाचा फायदा घेतला. ट्रम्प यांच्या वडिलांनी डेमोक्रॅटिक पक्षात प्रवेश केला. 

मॅनहॅटनमधील फिफ्थ एव्हेन्यूवर 58 मजली इमारत बांधली

यावेळी त्यांनी वडिलांच्या राजकीय प्रभावाचा फायदा घेतला. ट्रम्प यांचे वडील डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित होते. त्यांनी न्यूयॉर्कच्या महापौरांशी करार केला आणि हॉटेल करात 40 वर्षांची सूट मिळविली. त्यानंतर ट्रम्प यांच्याबद्दल असे म्हटले गेले की न्यूयॉर्कमध्ये त्यांना जे हवे ते ते साध्य करतात. यानंतर 1983 मध्ये ट्रम्प यांनी न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनमधील फिफ्थ एव्हेन्यूवर 58 मजली इमारत बांधली. ते ट्रम्प टॉवर म्हणून ओळखले जाते.

ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाचा ताबा कसा घेतला? 

ट्रम्प जेव्हा राजकारणात आले तेव्हा रिपब्लिकन पक्षात असे अनेक लोक होते ज्यांनी सांगितले की ते कोणत्याही किंमतीवर ट्रम्प यांना पाठिंबा देणार नाहीत, परंतु शेवटी त्यांना ट्रम्प यांचे समर्थन करावे लागले. अमेरिकन राजकारण तज्ज्ञ जेरेमी पीटर्स यांनी त्यांच्या 'इनसर्जन्सी' या पुस्तकात लिहिले आहे की, ट्रम्प यांचे राजकारणी न होणे हे त्यांचे सर्वात मोठे हत्यार बनले आहे. ट्रम्प यांनी ज्या प्रकारची विधाने केली, तशी विधाने अन्य कोणत्याही नेत्याने केली असती तर त्यांचे राजकारण संपले असते. ट्रम्प यांना राजकारणाची चांगली माहिती नव्हती. त्यामुळे ते न घाबरता आपले मत मांडत राहिले. त्यांनी सर्वप्रथम आक्रमक वक्तव्ये करून परंपरावादी मतदारांना आवाहन केले. त्यांनी गर्भपातासारख्या मुद्द्यांवर अशी विधाने केली जी जॉर्ज बुश आणि मिट रॉमनी यांच्यासारखे दिग्गज रिपब्लिकन नेते अगदी शांत आवाजातही सांगू शकले नाहीत.

आणि लाखो रिपब्लिकन ट्रम्प यांच्या समर्थनार्थ एकवटले

ट्रम्प यांनी उघडपणे सांगितले की ते अशा न्यायाधीशांची नियुक्ती करतील जे अमेरिकेतील गर्भपात अधिकारावरील निर्णय रद्द करतील. नंतर ट्रम्प यांनीही तेच केले. यामुळेच लाखो रिपब्लिकन ट्रम्प यांच्या समर्थनार्थ एकवटले. अशा स्थितीत 2020 च्या निवडणुकीत पराभूत होऊनही कोणताही रिपब्लिकन नेता ट्रम्प यांची जागा अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घेऊ शकला नाही. ट्रम्प यांनी प्रथम पक्षातील त्यांच्या विरोधकांना एक एक करून पराभूत केले आणि नंतर 2024 च्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आपले स्थान निश्चित केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget