एक्स्प्लोर

Donald Trump : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत

अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहे, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठीही निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सिनेट म्हणजेच वरिष्ठ सभागृहात विजय मिळवला आहे.

US Election Result 2024 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Republican presidential candidate Donald Trump) विजयी झाले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर 4 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा निवडणूक जिंकणारे ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ट्रम्प 2016 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले. 2020 च्या निवडणुकीत ते जो बिडेन यांच्याकडून पराभूत झाले. 132 वर्षांपूर्वी, ग्रोव्हर क्लीव्हलँड दोनदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. 1884 आणि 1892 च्या अध्यक्षीय निवडणुका त्यांनी 4 वर्षांच्या अंतराने जिंकल्या. कमला हॅरिस या निवडणुकीत विजयी झाल्या असत्या तर त्यांनी पहिल्या महिला राष्ट्रपती बनून इतिहास रचला असता. त्या सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत.

ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले

अमेरिकेतील 538 जागांपैकी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला 277 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 270 जागांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कमला हॅरिस यांच्या पक्षाने 224 जागा जिंकल्या आहेत. दोघांमध्ये केवळ 43 जागांचा फरक आहे. मात्र, उर्वरित सर्व 5 राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत चुरशीची लढत देऊनही कमला यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसोबतच अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहे, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठीही निवडणुका झाल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये बहुमत मिळाले असून हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आघाडीवर आहे.

ट्रम्प म्हणाले, मी अमेरिकेला महान बनवणार आहे

विजयानंतर अमेरिकन जनतेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, मी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवणार आहे. या दिवसासाठीच देवाने माझा जीव वाचवला होता. ट्रम्प यांच्यावर 13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये हल्ला झाला होता. एक गोळी कानाला लागली आणि बाहेर गेली. या हल्ल्यात त्यांचा जीव थोडक्यात बचावला.

अशक्य ते शक्य केले

निवडणुकीत विजय निश्चित झाल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेतील जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, लोकांना जे अशक्य वाटले ते आम्ही केले. देशाचे सर्व प्रश्न मी सोडवणार आहे. अलास्का, नेवाडा आणि ऍरिझोनामध्ये जिंकणे माझ्यासाठी मोठे आहे. हे अविश्वसनीय आहे. ट्रम्प म्हणाले की, मी अमेरिकन लोकांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी लढणार आहे. पुढील 4 वर्षे अमेरिकेसाठी महत्त्वाची आहेत. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय असल्याचे ट्रम्प म्हणाले. टेस्ला प्रमुख एलाॅन मस्क यांचे कौतुक करताना ट्रम्प म्हणाले की, तो एक स्टार आहे. निवडणुकीच्या प्रचारात ते रॉकेटप्रमाणे उडून गेले आहेत.

कमला सर्व स्विंग स्टेटमध्ये मागे पडल्या 

कमला हॅरिस या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभवाच्या अगदी जवळ आहेत, याचे एकमेव कारण असेल स्विंग स्टेट्स. 7 स्विंग राज्यांपैकी ट्रम्प यांनी 3 जिंकले आहेत आणि 4 मध्ये ते आघाडीवर आहेत. गेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी फक्त एक स्विंग स्टेट, नॉर्थ कॅरोलिना जिंकले. स्विंग स्टेट्स ही अशी राज्ये आहेत जिथे दोन पक्षांमधील मतांचे अंतर खूपच कमी आहे. हे कोणत्याही मार्गाने जाऊ शकतात. या राज्यांमध्ये 93 जागा आहेत.

ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेवरही ताबा मिळवला

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसोबतच अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहे, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठीही निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सिनेट म्हणजेच वरिष्ठ सभागृहात विजय मिळवला आहे. त्यांना 93 पैकी 51 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 50 जागांची गरज होती. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्येही रिपब्लिकन आघाडीवर आहेत. काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅट्सना 133 तर रिपब्लिकनला 174 जागा मिळाल्या आहेत. यात 435 सदस्य आहेत, त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. ट्रम्प 4 वर्षांनी व्हाईट हाऊसमध्ये परतणार आहेत. ते 2017 ते 2021 पर्यंत राष्ट्रपती होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget