AstraZeneca लस कोरोनापासून 100 टक्के सुरक्षा देणार, कंपनीच्या सीईओंचा दावा
corona vaccine | Pfizer-BioNTech ची लस आणि मॉडर्नाच्या लसीइतकीच AstraZeneca ची लस प्रभावी असेल असा दावा कंपनीचे सीईओ पास्कल सोरायट यांनी केलाय.
![AstraZeneca लस कोरोनापासून 100 टक्के सुरक्षा देणार, कंपनीच्या सीईओंचा दावा AstraZeneca vaccine gives 100 percent protection against Covid19 says CEO AstraZeneca लस कोरोनापासून 100 टक्के सुरक्षा देणार, कंपनीच्या सीईओंचा दावा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/21172119/Corona-Vaccine01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
corona vaccine: ब्रिटिश कंपनी AstraZeneca आणि Oxford ने विकसित केलेली कोरोना लस ही कोरोनापासून 100 टक्के सुरक्षा देणार असल्याचा दावा कंपनीच्या सीईओंनी केलाय. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.
AstraZeneca ची ही लस कोरोनाच्या तीव्र लक्षणांपासून सुरक्षा देत असून Pfizer-BioNTech कंपनीच्या 95 टक्के प्रभावीपणा आणि मॉडर्नाच्या 94.5 टक्के प्रभावीपणा सारखेच AstraZeneca ही लस प्रभावी असेल असंही सीईओंनी एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितलं.
यासाठी आवश्यक 'विनिंग फॉर्म्युला' कंपनीनं प्राप्त केला असून ही लस कोरोनापासून 100 टक्के सुरक्षा देणार आहे. या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण मिळणार आहे अशी माहिती AstraZeneca कंपनीच्या सीईओंनी दिलीय.
ब्रिटनच्या सरकारने 23 डिसेंबर रोजी Oxford AstraZeneca या कंपनीला त्यांचा मेडिकल डेटा सरकारकडे जमा करावा असं सांगितलं होतं, जेणेकरुन ब्रिटनमध्ये सार्वजनिक लसीकरणामध्ये याचा वापर करता येईल. कंपनीच्या या लसीच्या वापराला ब्रिटन सरकारकडून सोमवारी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Pfizer-BioNTech ही कोरोनाच्या लसीकरणात ब्रिटनमध्ये वापरण्यात आलेली पहिली लस आहे. गेल्या काही दिवसांपासून या लसीचा वापर आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी आणि गंभीर कोरोनाग्रस्तांवर करण्यात येत आहे. ब्रिटन सरकारने 10 कोटी लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी Oxford AstraZeneca च्या लसीचा वापर करण्यात येणार आहे.
सुरुवातीला AstraZeneca च्या लसीचा प्रभावीपणा 70 टक्के इतका होता. नंतर या लसीच्या प्रभावीपणात वाढ होऊन तो 90 टक्क्यांपर्यत पोहचला.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)