गेल्या सहा महिन्यांनंतर दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 19,000 पेक्षा कमी
आज भारतातील एकूण रुग्णसंख्या 2.78 लाख (2,78,690 )झालेली आढळून आली. गेल्या 170 दिवसांमधील ही सर्वात कमी संख्या आहे. 10 जुलै 2020 रोजी नवीन रुग्णांची संख्या 2,76,682 इतकी आढळली होती.

नवी दिल्ली : भारताने जागतिक महामारीच्या साथी विरुद्धच्या लढ्यात महत्वपूर्ण शिखर गाठले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या आता 19,000 पेक्षा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णांची राष्ट्रीय संख्या एकूण 18,732 इतकी आढळून आली आहे. दिनांक 1 जुलै 2020 रोजी नवीन रुग्णांची संख्या18,653 इतकी आढळली होती.
आज भारतातील एकूण रुग्णसंख्या 2.78 लाख (2,78,690 )झालेली आढळून आली. गेल्या 170 दिवसांमधील ही सर्वात कमी संख्या आहे. 10 जुलै 2020 रोजी नवीन रुग्णांची संख्या 2,76,682 इतकी आढळली होती. देशात सक्रीय रुग्णांची संख्या कमी होण्याचा कल कायम राहिला असल्याची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 21,430 रुग्णांना उपचारांनंतर बरे होऊन घरी पाठविण्यात आले. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या एकूण 2,977ने कमी झाली आहे. 72.37% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात केंद्रीत झालेले आढळून आले आहेत.
केरळमध्ये 3,782 रुग्णांसह एकाच दिवशी बरे होणाऱ्या सर्वाधिक रूग्णांच्या संख्येची नोंद झाली. 76.52% नवीन रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात केंद्रित झाल्याचे आढळून आले आहे. केरळमध्ये सर्वाधिक 3,527 रुग्ण आढळले आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्रात 2,854 नवीन रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासांत 279 रुग्णांचा मृत्यु झाला. 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात नव्याने रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण 75.27%आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक(60)रुग्ण मृत्यूमुखी पडले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
