एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Pakistan : पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, 12 वर्षे होते तुरुंगात, राष्ट्रपती होण्याची ही दुसरी वेळ 

Pakistan : झरदारी यांच्यावर भ्रष्टाचारापासून ते अपहरण आणि बँक फसवणुकीपर्यंतचे अनेक आरोप होते. 1990 मध्ये ते पहिल्यांदा तुरुंगात गेले.

Pakistan : पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी (Asif Ali Zardari) यांची शनिवारी पाकिस्तानचे 14 वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. असिफ अली राष्ट्रपती होण्याची ही दुसरी वेळ आहे. आसिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे 14 वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. झरदारी यांनी यापूर्वी 2008 ते 2013 या काळात पाकिस्तानचे 11 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यांनी विरोधी उमेदवाराचा 136 मतांनी पराभव केला. झरदारी (68) हे पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) यांचे संयुक्त उमेदवार होते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी महमूद खान अचकझाई (75) हे सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे (SIC) उमेदवार होते.

136 मतांनी विजयी

राज्यघटनेतील तरतुदींनुसार, नवीन राष्ट्रपतींची निवड नॅशनल असेंब्ली आणि चार प्रांतीय असेंब्लीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते. उद्योगपतीतून राजकारणी झालेले झरदारी हे पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती आहेत. त्यांना 255 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला 119 मतं पडल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी सांगितले. अशा प्रकारे ते 136 मतांनी विजयी झाले झरदारी हे माजी राष्ट्रपती डॉ आरिफ अल्वी यांची जागा घेतील, ज्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला होता.

दुसऱ्यांदा राष्ट्रपती होणार

2008 ते 2013 या काळात राष्ट्राध्यक्ष राहिलेले झरदारी हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले पहिले नेते आहेत. अध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार अचकझाई हे त्यांच्या पश्तूनखा मिल्ली अवामी पक्षाचे (PKML) प्रमुख आहेत. तुरुंगात जेरबंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक- या पक्षाशी संलग्न असलेल्या सुन्नी इत्तेहाद कौन्सिल (एसआयसी) च्या बॅनरखाली निवडणूक लढवत होते. 

आसिफ अली झरदारी 12 वर्षे तुरुंगात राहिले

झरदारी यांच्यावर भ्रष्टाचारापासून ते अपहरण आणि बँक फसवणुकीपर्यंतचे अनेक आरोप होते. 1990 मध्ये ते पहिल्यांदा तुरुंगात गेले. यानंतर 1996 मध्ये ते पुन्हा तुरुंगात गेले. त्यांनी जवळपास 12 वर्षे तुरुंगात काढली. 1997 ते 2004 या काळात त्यांना भ्रष्टाचार आणि खुनाच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगावा लागला होता. नोव्हेंबर 2004 मध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता, परंतु खून खटल्यात सहभागी न झाल्याने त्याला पुन्हा अटक करण्यात आली. स्विस कंपनीशी संबंधित एका प्रकरणात झरदारी यांना लाच घेतल्याप्रकरणीही दोषी ठरवण्यात आले होते. झरदारी यांच्यावर केवळ पाकिस्तानातच नाही तर ब्रिटन आणि स्पेनसह अनेक देशांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा>>>

Pakistan : शाहबाज शरिफ दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी, सोमवारी पार पडणार शपथविधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget