एक्स्प्लोर

Cambodia Cyber Slaves: नोकरीचे आमिष आणि आधुनिक जगातील गुलामगिरी, कंबोडियात सायबर गुन्हेगारीचे मायाजाळ

Cambodia Cyber Slaves: आजच्या आधुनिक जगातही माणसांना गुलाम बनवून त्यांना मारहाण करून हवं तसं काम करून घेतलं जात आहे, असं कोणी म्हटलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. मात्र हो हे खरं आहे.

Cambodia Cyber Slaves: आजच्या आधुनिक जगातही माणसांना गुलाम बनवून त्यांना मारहाण करून हवं तसं काम करून घेतलं जात आहे, असं कोणी म्हटलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. मात्र हो हे खरं आहे. पूर्वी पाश्चिमात्य देशात आफ्रिकन खंडातून माणसांना पकडून त्यांची बाजारात विक्री केली जात होती. मात्र आज ही पद्धत बदलली आहे. आता माणसांची सायबर जाळ्यातून फसवणूक करून त्यांना नोकरी व इतर गोष्टींचं आमिष दाखवून कंबोडिया, तैवान आणि म्यानमार सारख्या देशात बोलावले जाते. यानंतर या माणसांना गुलाम बनवले जाते. नुकतंच असं एक प्रकरण समोर आलं आहे. जे पुण्यातील आयटी कंपनीत आर्थिक सिक्युरिटीज विश्लेषक म्हणून काम करणाऱ्या कबीर शेख याचं आहे. कबीर शेख याच्या प्रकरणामुळे जगातील सर्वात मोठ्या सायबर फसवणूक जाळ्याचा भांडाफोड झाला आहे.

ऑनलाईन पद्धतीने कबीरला कंबोडियात सायबर सेक्युरिटी तज्ज्ञ म्हणून काम करण्याची ॲाफर मिळाली होती. ज्यासाठी त्याला तब्बल 5 हजार डॉलर्स पगाराची ऑफर देण्यात आली. यासाठी तो पुण्याहून बेंगळुरू, बेंगलूरू ते बॅकांक आणि मग बँकाकहून कंबोडिया प्रवास करून संबंधित कंपनीत पोहोचला. मात्र त्याने विचारलं केला होता, त्या उलट इथं सर्व घडत होतं. त्याला कंबोडियात या कंपनीने गुलाम बनवलं आणि शादी डॅाट कॅाम, जीवनसाथी डॅाट कॅाम, डिवोर्सी डॅाट कॅाम या लग्नासाठी जोड्या जमवणाऱ्या साईटवर खोटी प्रोफाईल तयार करून लोकांची फसवणूक करण्याचं काम करण्यास सांगितलं. सुदैवाने 22 दिवसांच्या भयंकर अनुभवानंतर कबिरची सुटका झाली. मात्र हे एक प्रकरण झालं, जे भारतात समोर आलं आहे. मात्र अशी अनेक प्रकरण गेल्या काही वर्षात भारतासह जगभरात घडली आहेत. अजूनही लाखो लोक या जाळ्यात अडकून नाइलाजाने गुलामगिरी करत आहेत. मात्र हे सर्व सुरु कसं झालं? लोकांना कशा प्रकारे सायबरच्या जाळ्यात अडकवून त्यांना गुलाम बनवलं जात? तसेच किती मोठा आहे हा व्यवसाय, हे आपण जाणून घेणार आहोत.

12,000 डॉलर्समध्ये चिनी नागरिकाची विक्री

'अल-जझीरा’ या वाहिनीने सायबर गुलामगिरीतून सुटका झालेल्या अनेकांची मुलाखत घेऊन एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे. ज्यात त्यांनी ही छळवणूक सोसलेल्या अनेकांची अनुभव आणि नेमका काय आहे हा प्रकार आणि याबाबत बरीच माहिती जगासमोर आणली आहे. यातच त्यांनी चीनमधी आर्थिक सिक्युरिटीज विश्लेषक लू झियांग्री जो या जाळ्यात फसला होता, त्याशी संवाद साधला आहे. अल-जझीराशी बोलताना झियांग्री म्हणाले आहे की, 2020 मध्ये त्याने कंबोडिया देशात आल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. तो इथं आपल्या मित्राच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. मात्र कोरोना संकटामुळे हे रेस्टॉरंट बंद झाले आणि तो कंबोडियात अडकला. त्याकडे घरी  परतण्यासासाठी तिकीट खरेदी करण्याचे देखील पैसे देखील त्याकडे नव्हते. त्यावेळी त्याला तेथील एका व्यक्तीने नोकरीची ऑफर दिली. याबद्दल बोलताना झियांग्री म्हणाले की, ''त्याने सांगितले की मला फक्त क्लायंटसाठी सिक्युरिटीज मार्केटचे विश्लेषण करण्याचे काम करायचे आहे. ज्यासाठी दरमहा पगार 1,500 डॉलर्सपेक्षा जास्त असेल. मला वाटले की चीनला परत जाण्यासाठी मला फक्त दोन महिने काम करावे लागेल.'' जेव्हा तो पहिल्या दिवशी काम करण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याला कळलं की, हे एक तरूणांची फसवणूक करणारं मोठं जाळं आहे, ज्यात तो अडकला आहे. जेव्हा त्याने तिथून निघण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला सांगण्यात आले की, तो जाऊ शकत नाही. त्याने याचे कारण विचारले असता त्याला सांगण्यात आले की, त्याला कंपनीला 12,000 डॉलर्समध्ये विकण्यात आले आहे. तो जोपर्यंत हे पैसे परत करत नाही त्याला इथून जात येणार नाही. 

अल-जझीराशी बोलताना कंबोडिया येथील मानवाधिकार एनजीओचे इंटरनॅशनल जस्टिस मिशनचे संचालक जेक सिम्स म्हणाले की, तस्करी आणि गुलामगिरीची प्रकरणे असामान्य नाहीत. कंबोडियामध्ये हजारो लोकांना स्कॅमिंग कंपाऊंडमध्ये काम करण्यास भाग पाडले जात आहे. ते म्हणाले की, कॅसिनो, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये स्कॅमिंग कंपाऊंड्स संपूर्ण कंबोडियात पसरलेले आहेत. यामध्ये अनेक लोकांना गुलाम बनवून ठेवण्यात आले आहे. सिम्स आणि त्यांच्या टीमने अनेक परदेशी नागरिक ज्यात चायनीज, थाई, व्हिएतनामी, इंडोनेशियन, मलेशियन, म्यानमारमधील लोकांचा समावेश आहे. अशा लोकांची यातून सुटका करण्याचं काम केलं आहे आणि करत आहे. जेक सिम्स याबाबत माहिती देताना पुढे म्हणाले आहेत की, यामध्ये अडकलेले बरेच लोक यातून निघण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना सशस्त्र रक्षकांमुळे येथून निघणं शक्य होत नाही. यासंबंधित अनेक बातम्या देखील समोर येतात. यामध्ये अडकलेल्या लोकांनी पोलिसांना फोन केल्यास त्यांना मारहाण करण्यात येते. ओनलाईन लोकांची फसवणूक करून पैसे कमावण्यासाठी या लोकांना मानवांना विकल्या जाणार्‍या मार्केटप्लेसमध्ये हजारो डॉलर्समध्ये विकले जाते. 

गुलामगिरीतील अत्याचाराचे वेदनादायक व्हिडीओ आले समोर 

सायबर फसवणुकीत अडकून गुलाम बनवण्यात आलेल्या अनेकांचे व्हिडीओ आणि फोटो देखील 2021 मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून समोर आले आहेत. यामध्ये समोर आलेल्या व्हिडीओत अनेक माणसांवर शारीरिक अत्याचार केल्याचे दिसत आहे. तसेच अनेकांना इलेक्ट्रिक शॉक दिले जात असल्याचं आणि लोखंडी पलंगाशेजारी बेड्या घालून बसल्याचे या व्हिडीओंमध्ये दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये एक माणूस एका खोलीच्या कोपऱ्यात बसलेला दिसत आहे. ज्याला अनेक लोक मिळून दांड्यानी मारहाण करत असून तो आपल्या हाताच्या सहाय्याने आपल्या डोक्याला लागू नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे. या व्यक्तीच्या  कटुंबियांना त्याला सोडण्यासाठी 3 हजार डॉलर्सची मागणी करण्यात आली होती, तसेच पैसे न दिल्यास त्याचे हातपाय कापण्याची धमकी देण्यात आली होती. 

तस्करी, छळ आणि गुलाम

काही महिन्यांच्या तपासादरम्यान, अल जझीराने कंबोडिया, चीन, थायलंड आणि अलीकडेच मलेशियामधील अनेक पीडितांशी संवाद साधला. जे कंबोडियन सायबर गुलामगिरीतून सुटले. त्याची ओळख जपण्यासाठी अल-जझीराने त्यांना टोपणनावे देत संवाद साधल्याचे डॉक्युमेंटरीमध्ये सांगण्यात आले आहे. याबाबत बोलताना अल-जझीराशी संवाद साधताना मिंग अल (टोपणनाव) म्हणाला की, तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं नाही, तर ते मारहाण करतात. इलेक्ट्रिक बॅटन शॉक देतात. मिंग मार्च 2021 पत्नी, लहान मूल आणि नवजात बाळासह कंबोडियात आला होता. त्याने चिनी सोशल मीडिया अॅप WeChat वर एक जाहिरात पहिली होती, ज्यामध्ये तो काम करत असलेल्या कामापेक्षा 10 पट जास्त पगाराची ऑफर करण्यात आली होती. मात्र संपूर्ण आशियातील इतर अनेक लोकांप्रमाणे ज्यांनी WeChat, QQ, WhatsApp किंवा Telegram सारख्या अॅप्सवर नोकरीच्या जाहिराती पाहून अप्लाय केलं, तसेच त्यानेही केलं. नंतर त्याची फसवणूक करून त्याला कंबोडियाच्या सायबर-घोटाळा उद्योगात आणले गेले. सशस्त्र तस्करांनी त्याला आणि त्याच्या गटातील इतरांना दुचाकीवरून व्हिएतनामी सीमेपलीकडे नेले. तो म्हणतो की, "मला फक्त इतकीच आशा होती की त्यांच्या बंदुकांचा वापर आमच्यावर होणार नाही. पासपोर्टशिवाय कंबोडियात तस्करी होईल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. ऑनलाईन नोकरी शोधताना आपली फसवणूक होणार, अशी ही मला अशा नव्हती.'' आपला हा भयावह अनुभव सांगताना त्याचा कंठ दाटुन आला होता.

चिनी सायबर-घोटाळा ऑपरेशन्स आणि अब्जावधींचा नफा

चिनी सायबर-घोटाळा ऑपरेशन्स हा मोठा व्यवसाय आहे. यात वर्षाला कोट्यवधी डॉलर्सची चोरी केली जाते. हे घोटाळेबाज केवळ त्यांच्याच देशवासीयांनाच लक्ष्य करत नाहीत. तर युरोप, अमेरिका ते ऑस्ट्रेलियापर्यंत परदेशी लोकांना लक्ष्य करतात. याबाबत चोवीस वर्षीय हाँग अल-जझीराला सांगतो की, मला लॉटरी घोटाळ्यात काम करण्यास भाग पाडले गेले. हाँगने ऑनलाईन जाहिरातीतून फूड फॅक्टरीमध्ये गुणवत्ता नियंत्रक म्हणून नोकरी स्वीकारली होती. त्याने सांगितलं की, त्याला चिनी सोशल मीडिया अॅप QQ वर घोटाळ्यातील पीडितांशी संपर्क साधण्यासाठी, नातेसंबंध निर्माण करण्यासाठी, त्यांना लॉटरीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यासाठी दोन अॅप्स डाउनलोड करण्यास लोकांना सांगण्यास सांगितले गेले होते.

त्याने सांगितलं की, ''लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी तो त्यांना सांगायचा की आमचा टॅग-ऑन प्रोग्राम लॉटरी सिस्टममध्ये हॅक झाला आहे. तुम्ही दोन्ही अॅप्लिकेशन्समध्ये लॉग इन केल्यास, पडद्यामागून ड्रॉ नियंत्रित करून तुम्ही जिंकाल, याची आम्ही खात्री करू शकतो.” तो म्हणाला की, या लॉटरीत पैसे लावणाऱ्यांना ते कधीही जिंकू शकत नाही हे सांगण्याची त्याला परवानगी नव्हती. तसेच पैसे गुणवणूक करण्यास जे नकार देत होते, त्याचे खाते ब्लॉक केले जात होते. जेणेकरून आतापर्यंत गुंतवलेले पैसे ते काढू नये म्हणून असं केलं जात होत, असं हाँग याने सांगितलं. 

हाँगच्या म्हणण्यासानुसार, या कंपनीसाठी सुमारे 200 लोक काम करत होते. यात कंपनी मोठ्या प्रमाण लोकांची फसवणूक करून पैसे कमवत होती. याला बळी पडलेली लोक दोन महिन्यांत 15,000 डॉलर्स ते 30,000 डॉलर्स गुंतवणूक करतात. यात दहा ते वीस लोक 900,000 डॉलर्स पेक्षा जास्त नफा कमावतात, अशी माहिती ही त्याने दिली आहे. 

सायबर गुलामगिरीचे केंद्र कंबोडियाच का बनलं?

कंबोडिया हा आशियातील तिसरा सर्वात भ्रष्ट देश आहे. याआधी उत्तर कोरिया आणि अफगाणिस्तानचा नंबर लागतो. येथील पंतप्रधान हुन सेन आणि त्यांच्या कंबोडियन पीपल्स पार्टीने जवळपास 40 वर्षे देशावर राज्य केले आहे. आंतरराष्ट्रीय अधिकार गटांनी त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर भ्रष्टाचार, क्रूरता आणि दडपशाहीचे आरोप केले आहेत. त्यांनी स्वतंत्र माध्यमे बंद केली आहेत. ते आपल्या टीकाकारांचा छळ करत असून मुख्य विरोधी पक्षावर त्यांनी बंदी घातली आहे. अनेक लोक म्हणतात की, ते देशाला त्यांच्या स्वतःच्या व्यवसाय साम्राज्याप्रमाणे वागवतात. चीनशी देशाच्या वाढत्या संबंधांनी त्यांना घनिष्ठ लष्करी सहकार्य आणि चिनी गुंतवणूकदारांनी या सर्व गोष्टींना आणखी प्रोत्साहन दिले आहे. यातच डोंग लेचेंग, झू आयमिन आणि शी झिजियांग या तीन प्रमुख गुंतवणूकदारांना चीनमध्ये कोट्यवधी डॉलर्सच्या आर्थिक गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. त्या सर्वांचा कंबोडियातील सायबर गुलामगिरीशी संबंध आहे. यातच चिनी गुंतवणुकीमुळे एकेकाळचे शांत समुद्रकिनारी असलेले Sihanoukville शहर (कंबोडियातील) एका कॅसिनो महानगरात बदलले आहे. जिथे संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मानवी तस्करी आणि गुलामगिरीसाठीचे हे मुख्य केंद्र बनलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
Embed widget