(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Diego Maradona यांच्या संपत्तीचा लिलाव; लग्झरी कारपासून सिगारच्या बॉक्सचाही समावेश
Diego Maradona : दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांच्या संपत्तीचा लिलाव आज करण्यात येणार आहे. लग्झरी कारपासून ते सिगारच्या बॉक्सपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश लिलावाच्या यादीत आहे.
Argentina News : अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांच्या संपत्तीचा आज लिलाव होणार आहे. दोन बीएमडब्ल्यू कारपासून ते क्युबन सिगारच्या बॉक्सपर्यंतचा मॅराडोना यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे. ब्यूनस आयर्स (Buenos Aires) मध्ये मॅराडोना यांच्याशी संबंधित जवळपास 90 वस्तूंचा लिलाव (virtual Auction Block) करण्यात येणार आहे. मॅराडोना यांच्याशी संबंधित वस्तूंच्या लिलावाचं आयोजन करणारे एड्रियन मर्काडो (Adrian Mercado) यांनी शनिवारी मीडियाशी बोलताना सांगितलं की, आमच्याकडे 1120 लोकांनी नोंदणी केली आहे आणि ते लिलावात बोली लावण्याच्या तयारीत आहे.
मॅराडोना यांच्या वस्तूंचा लिलाव
मॅराडोना यांच्याशी संबंधित वस्तूंच्या लिलावाचं आयोजन करणारे एड्रियन मर्काडो (Adrian Mercado) यांनी सांगितलं की, "ऑफर केल्या जाणार्या 87 लॉटमध्ये कमीत कमी बोली $50 ते $900,000 पर्यंत लावल्या जातील. अर्जेंटिनाच्या अधिकार्यांनी 1986 च्या विश्वविजेत्या मॅराडोना यांच्या संपत्तीच्या वारसांशी करार करून विक्रीचे आदेश दिले होते. ब्युनोस आयर्सचा व्हिला डेव्होटो (Villa Devoto) देखील लिलावात काढण्यात आला आहे. हा व्हिला मॅराडोना यांनी 1980 च्या दशकात त्यांच्या आई-वडिलांना दिला होता. त्यावेळी ते 10 व्या क्रमांकाचा व्यावसायिक संघ बोका ज्युनियर्सकडून खेळत होते."
व्हिला, लग्जरी कार यांच्यासह अनेक वस्तूंचा लिलाव
मॅराडोना यांचा जन्म 1960 मध्ये झाला होता. त्यांनी आपल्या आई-वडिलांना एक व्हिला भेट म्हणून दिला होता. तिथे स्वतः मॅराडोना आपल्या मृत्यूपर्यंत राहत होते. याचाही आज लिलाव करण्यात येणार आहे. या व्हिलामध्ये एक स्विमिंग पूलही आहे. यासाठी $900,000 ची किमान बोली निश्चित करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त दोन बीएमडब्ल्यू कार (BMW Cars) ही लिलावासाठी आहेत, बीएमडब्ल्यू 2017 आणि 2016 चं मॉडेल आहे. यासाठी 225,000 आणि 165,000 डॉलर किमान बोली लावण्यात आली आहे. तसेच 38,000 डॉलरची मूळ किंमत असलेली Hyundai व्हॅन देखील लिलावासाठी आहे. ब्युनोस आयर्सच्या दक्षिणेस एक दोन बेडरूमचे अपार्टमेंट देखील लिलावात आहे, ज्याची मूळ किंमत $65,000 आहे.
विक्रीसाठी एक ट्रेडमिल देखील आहे ज्याचा वापर मॅराडोना यांनी दुबईतील वास्तव्यादरम्यान केला होता. क्युबातील दिवंगत नेते फिदेल कास्त्रो यांच्यासोबतचा फुटबॉल स्टार मॅराडोना यांचा एक फोटो आणि क्युबा सिगार यांचाही लिलावाच्या यादीत समावेश आहे. तसेच, कास्त्रो यांनी स्वाक्षरी केलेल्या हस्तलिखित पत्राचाही (Handwritten Letter) आजच्या लिलावात समावेश असणार आहे.
दरम्यान, 2020 मध्ये दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मॅरेडोनाला अर्जेंटिनामध्ये हिरो मानले जाते. मॅरेडोनाने 91 सामन्यांत 34 गोल केले होते. क्लब स्तरावर मॅरेडोनाने 588 सामन्यात 312 गोल केले होते. मॅराडोना यांनी 1986 मध्ये अर्जेंटिनाला मॅक्सिको येथील विश्वचषक जिंकवून दिला होता. या स्पर्धेत त्यांनी दोन गोल केले होते जे आतापर्यंतच्या सर्वोत्तम गोल्समध्ये मोजले जातात. क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंड विरोधात केलेल्या या गोल्सना हँड ऑफ गॉड आणि गोल ऑफ द सेंचुरी नावाने ओळखलं जातं.