एक्स्प्लोर

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!

Maharashtra CM:भाजप आणि महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी बसावं, अशी भाजप कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याची माहिती पुढे आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकाचं (Maharashtra Assembly Election 2024) अंतिम निकाल आता जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालंय. शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात महायुतीचंच सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच गेल्या लोकसभेला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावं लागणाऱ्या महायुतीने विदर्भात मुसंडी मारत घवघवीत यश मिळवले आहे. लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. मात्र इथं देखील महायुतीने यश खेचून आणले आहे.
  
दरम्यान, भाजप आणि महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी बसावं, अशी फक्त भाजप कार्यकर्त्यांची इच्छा नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही त्याच भूमिकेत असल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच संघाचा नॅचरल चॉईस असण्याचे अनेक कारण देखील पुढे आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनीच मुख्यमंत्री व्हावे ही संघाची इच्छा!

- देवेंद्र फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवक राहिले आहे...

-नेहमीच त्यांनी राजकीय आचरणातही संघाच्या शिस्तीचे पालन केले आहे.. 

-राजकीय नफ्या तोट्यासाठी त्यांनी कधीही स्वतः संघाचा स्वयसेवक असल्याचे लपविले नाही... 

-देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे असल्याने संघाच्या सर्वच पातळ्यांवर त्यांचा थेट डायलॉग नेहमीच राहिला आहे...

-लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जोरदार झटक्यानंतर विधानसभा निवडणुकीत संघांने भाजपसाठी जोरदार प्रयत्न केले... त्यासाठीच्या समन्वयाच्या महत्त्वाच्या पातळ्यांवर देवेंद्र फडणवीस हेच संघाच्या संपर्कात होते... 

- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कडवट हिंदुत्वाचा मुद्दा फडणवीस पेक्षा जास्त जोरात महायुतीच्या इतर कुठल्याही नेत्याने उचलला नाही...

-महाराष्ट्रात विकास, हिंदुत्वाचा विचार आणि सर्व समाजांना सोबत घेऊन सरकार चालवण्याची क्षमता फडणवीस एवढी इतर कोणांमध्येही नाही...

-संघाच्या सर्वच कामांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी होतात.. कधीही राजकीय नफ्यासाठी त्यांनी स्वतःला संघापासून वेगळं सांगण्याचे प्रयत्न केले नाही...

-भाजपला गेले पाच वर्ष महाराष्ट्रात एक संघ ठेवण्यामध्ये फडणवीसांची भूमिका राहिली असून पुढेही भाजपची सारख्या वैचारिक दिशेत वाटचाल घडवण्याची क्षमता फडणवीस यांच्यामध्येच आहे हे संघाला पुरतं माहित आहे....

संघ आणि फडणवीस यांच्यात गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?

-देवेंद्र फडणवीस हे संघाचा नॅचरल चॉईस का आहेत?? आणि संघ व फडणवीस तसेच संघ व भाजपमध्ये गेल्या पाच महिन्यात काय घडलं आहे, हे समजून घेण्यासाठी गेल्या पाच महिन्यांची क्रोनोलॉजी आणि बैठकांचे सत्र लक्षात घेण्यासारखे आहे...

- 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर 5 जूनला पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी माझी आहे, मी राजीनामा देऊन सरकार मधून बाहेर पडतो, मला संघटनेत काम करू द्या अशी भूमिका घेतली होती...

- प्रदेश भाजपमध्ये लगेच फडणवीसांच्या या राजकीय स्टॅन्ड संदर्भात काय भूमिका घ्यावी याबद्दल काहीसे कन्फ्युजन दिसून आले होते... मात्र संघ त्वरित ॲक्टिव्ह झालं होतं...

-फडणवीसांचे राजीनामाच्या भाषेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 6 जून रोजी संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये इतर पदाधिकाऱ्यांसह नागपुरात धरमपेठ परिसरातील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि फडणवीसांशी तासभर चर्चा केली होती...

-त्यानंतर अवघ्या काही तासात फडणवीस हे त्यांच्या पदावर कायम राहतील, ते राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडणार नाही, संघटनेची जबाबदारी स्वीकारणार नाही असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले होते....

- सुरुवातीच्या बैठकांमध्ये भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन नेमकं काय फायदा झाला असे प्रश्नही संघ परिवारातील काही संघटनांकडून विचारण्यात आल्याची माहिती आहे... 

- 23 जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ भागातील प्रभादेवी मध्ये यशवंत भवनात संघाचे सहसरकार्यवाह अरुण कुमार, दुसरे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर अनेक संघ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती... त्या बैठकीत अजित पवार यांना सोबत का घेण्यात आले या मुद्द्यावर स्पष्ट चर्चा झाल्याची माहिती होती...

-यशवंत भवन मधील बैठकीच्या काही तासानंतर त्याच रात्री अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले होते आणि त्यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती... 
(23 जुलै च्या मुंबई आणि दिल्लीतील बैठकीतून संघाचा अजित पवार यांच्या संदर्भातला नाराजीचा सुर काहीसा मवाळ करण्यात भाजपला यश आलं होतं...)

-त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील भूमिके संदर्भात स्पष्टता आणली गेली.. ( कारण त्या काळात प्रसार माध्यमांमध्ये देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील, ते महाराष्ट्रात राहणार नाहीत, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केले जाईल अशा बातम्या सुरू झाल्या होत्या..) 

-तेव्हा 2 ऑगस्ट रोजी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले होते की ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, ते महाराष्ट्राच्याच राजकारणात राहतील... 

-देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी नागपुरात संघ कार्यालयात देवेंद्र फडणवीस आणि सहसरकार्यवाह अतुल लिमये यांची पुन्हा एकदा दीर्घ बैठक झाली होती... ( या नंतर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महाराष्ट्रातच राहील आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तेच महाराष्ट्रात भाजपचा नेतृत्व करतील हे स्पष्ट झालं होतं... )

- त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी नागपूरच्या एका शाळेत संघ परिवारातील सर्व संघटनांची समन्वय बैठक पार पडली.. संघ परिवाराचा एक भाग म्हणून भाजपलाही बोलावण्यात आले होते.. भाजपच्या वतीने स्वतः देवेंद्र फडणवीस या बैठकीत सहभागी झाले होते आणि त्यांनी 40 ते 45 मिनिट या ठिकाणी भाषण देत भाजपची संपूर्ण भूमिका सांगितली होती, महाराष्ट्रात निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप समोर काय अडचणी आहेत, फेक नरेटीव कसा लोकसभेच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला, विविध जातींच्या आरक्षणाचा मुद्दा कसा अडचणीचा ठरतोय हे सर्व त्या बैठकीत चर्चेला आले होते...

- 9 ऑगस्ट च्या त्याच बैठकीत संघ परिवारातील सर्व संघटनांना भाजपसाठी अनुकूल ग्राउंड तयार करण्याच्या उद्दिष्टाने ऍक्टिव्ह करण्याचं निर्णय ही झालं होतं...

-हरियाणाच्या निकाला नंतर 10 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडली होती.. हरियाणा मधील संघ आणि भाजपचा मायक्रो प्लानिंग महाराष्ट्रात कसं अमलात आणायचं याबद्दल त्या बैठकीत चर्चा झाली होती...

-त्यामुळे गेल्या पाच महिन्यात लोकसभेच्या पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनाम्याची भाषा करणाऱ्या फडणवीस यांना संघांनं फक्त राजीनाम्यापासून परावृत्तच केलं नाही, तर त्यांची भूमिका महाराष्ट्रातच राहील हेही राजकीय दृष्टिकोनातून स्पष्ट करून घेतलं.. तसेच भाजपसोबत समन्वय साधताना शीर्ष पातळीवर फडणवीस यांच्या माध्यमातूनच तो समन्वय घडल्याचं गेल्या काही दिवसातील बैठकांच्या सत्रातून दिसून येतं... 

त्यामुळे भाजपच्या महाराष्ट्रातील विजयाचा ग्राउंड तयार करत पाया रचणाऱ्या संघाचा नॅचरल चॉईस देवेंद्र फडणवीस हेच आहेत हे सध्या तरी दिसून येत आहे...

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Embed widget