एक्स्प्लोर

Apple WWDC 2023: ॲपलची वर्ल्डवाईड डेव्हलपर्स परिषद आजपासून, कधी आणि कसे व्हाल साक्षीदार ॲपलच्या या कार्यक्रमाचे?

Apple WWDC 2023: ॲपल वर्षातला सर्वात मोठा कार्यक्रम वर्ल्डवाईड डेव्हलपर्स परिषदेला आजपासून सुरु करण्यात येत आहे.

Apple WWDC 2023 : जगप्रसिद्ध ॲपल (Apple) कंपनीचा वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम आजपासून (5 जून) सुरु करण्यात येत आहे. ॲपलकडून 5 जून ते 9 जून दरम्यान वर्ल्डवाईड डेव्हलपर्स परिषदचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेसाठी जगभारतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं ॲपलकडून सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात ॲपलचे सीईओ टीम कुक (Tim Cook) यांच्या भाषणाने होणार आहे. ॲपलकडून या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी प्रत्येकाला मिळते. हा कार्यक्रम ॲपल कंपनीसाठी फार महत्त्वाचा असतो. या कार्यक्रमामुळे ॲपलला जगभरातील हुशार आणि अनेक तज्ञ लोकांशी जोडण्याची एक उत्तम संधी मिळते असं देखील कंपनीच्या वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदाची देखील ही परिषद ॲपलसाठी फार महत्त्वाची असणार असल्याचं ॲपलकडून सांगण्यात येत आहे. 

कोणत्या प्रॉडक्टची होऊ शकते घोषणा?

या कार्यक्रमामध्ये ॲपलकडून महत्त्वाच्या घोषणा केल्या जातात. या घोषणांची उत्सुकता जगभारातील ॲपल युजर्सना लागून राहिलेली असते. त्यामुळे यंदा या परिषदेमध्ये कोणत्या प्रकारच्या घोषणा करण्यात येणार याची  ॲपलचे युजर्स आतुरतेने वाट पाहत आहेत. ॲपलचे युजर्स सध्या ॲपलच्या VR/AR हेडसेटची आतुरतेने वाट बघत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात ॲपलच्या या प्रॉडक्टविषयी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात ॲपलकडून iOS 17, iPadOS 17, macOS 14, watchOS 10,tvOS 17, AR/VR headset,15-inch MacBook Air या प्रॉडक्ट्सची घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

कुठे आणि कधी होणार परिषद?

ॲपलकडून 5 जून ते 9 जूनदरम्यान या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद अमेरिकेतील Apple Park, Cupertino, कॅलिफोर्निया येथे आयोजित करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री 10.30 वाजल्यापासून या परिषदेची सुरुवात होईल. तसेच मुख्य घोषणा आणि सॉफ्टेवर विषयी माहिती ही 6 जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता करण्यात येईल. 

कुठे पाहाल हा कार्यक्रम?

हा कार्यक्रम तुम्ही ॲपल टीव्ही, ॲपल यूट्यूब आणि ॲपल इव्हेंट पेजवर पाहू शकता. ॲपलच्या अधिकृत वेबसाईटवर देखील हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. आयफोन, आयपॅड, मॅक आणि ऍपल टीव्हीवर उपलब्ध असलेल्या ॲपल टीव्हीअॅपच्या 'Watch Now'मध्ये तुम्ही या कार्यक्रमाचे लाईव्हस्ट्रीमिंग पाहू शकतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Apple WWDC 2023: ॲपलची वर्ल्डवाईड डेव्हलपर्स परिषद 5 जूनपासून, ॲपल कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget