Apple WWDC 2023: ॲपलची वर्ल्डवाईड डेव्हलपर्स परिषद 5 जूनपासून, ॲपल कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार?
Apple WWDC 2023: ॲपलच्या या परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले असून ॲपल या परिषदेमध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Apple WWDC 2023 : ॲपल (Apple) या नामांकित कंपनीची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद (WWDC 2023) 5 जून ते 9 जून या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. तसेच या परिषदेची भारतीय वेळेनुसार सुरुवात पाच जून रोजी रात्री दहा वाजता होणार आहे. ॲपल कंपनीचा हा वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात ॲपलकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील करण्यात येतात. याची उत्सुकता जगभरातील लोकांना लागून राहिलेली असते. त्यामुळे यंदाच्या ॲपलच्या या परिषेदत होणाऱ्या महत्त्वाच्या घोषणांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
या कार्यक्रमासाठी ॲपलकडून बरीच तयारी सध्या करण्यात येत आहे. हा कार्यक्रम अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच ॲपलचे सीईओ टीम कुक (Tim Cook) यांच्या भाषणाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येते. या परिषदेच्या मुख्य अधिकारी सुसान प्रेस्कोट यांनी म्हटले की, "हा कार्यक्रम आमच्यासाठी आणि कंपनीसाठी फार महत्त्वाचा असतो. या कार्यक्रमामुळे आम्हाला जगभरातील हुशार आणि अनेक तज्ञ लोकांशी जोडण्याची एक उत्तम संधी मिळते. त्यामुळे यंदाची देखील ही परिषद आमच्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे."
ही परिषद ॲपलचा एक वार्षिक कार्यक्रम असतो पण या कार्यक्रमामध्ये ॲपलकडून त्यांच्या भविष्यातील प्रॉडक्ट्स आणि प्रोजेक्टविषयी देखील घोषणा करण्यात येते. हा कार्यक्रम निशुल्क असतो तसेच यामध्ये ॲपलच्या विविध प्रोडक्ट्सच्या सीरिजविषयी देखील माहिती दिली जाते. ॲपलचे युजर्स सध्या ॲपलच्या VR/AR हेडसेटची आतुरतेने वाट बघत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात ॲपलच्या या प्रॉडक्टविषयी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात ॲपलकडून iOS 17, iPadOS 17, macOS 14, watchOS 10,tvOS 17, AR/VR headset,15-inch MacBook Air या प्रॉडक्ट्सची घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
कुठे पाहाल ॲपलची ही परिषद?
ॲपलच्या या परिषदेला पाच जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 9 जून रोजी या कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रम तु्म्ही ॲपल टीव्ही, ॲपल यूट्यूब आणि ॲपल इव्हेंट पेजवर पाहू शकता. तसेच हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार पाच जून रोजी रात्री 10.30 वाजता सुरु होईल. या कार्यक्रमाती महत्त्वाचा दिवस हा 6 जून असणार आहे. ज्याचे प्रसारण 6 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 1.30 वाजता करण्यात येणार आहे. ॲपलचा हा भव्यदिव्य कार्यक्रम तुम्ही देखील लाईव्ह पाहू शकता. '
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Space Farming: 'हा' देश करतोय अंतराळात शेती, कशी उगवली जातात अंतराळात पीकं? वाचा सविस्तर