China Corona : कोरोनाचा Apple ला फटका, चीनमधील लॉकडाऊनमुळे iPhone प्रोडक्शनवर परिणाम
China Coronavirus : कोरोनाच्या वाढता संसर्गामुळे जगातील सर्वात मोठी फॅक्ट्री बंद करण्यात आल्याचा फटका Apple कंपनीला बसला आहे. चीनमधील लॉकडाऊनमुळे iPhone प्रोडक्शनवर परिणाम झाला आहे.
China Apple Company : चीनमध्ये ( China ) पुन्हा एकदा कोरोनाचा कहर ( Coronavirus Rises ) पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस येथील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. परिणामी अनेक शहरांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन ( Lockdown ) लावण्यात आलं आहे. या टाळेबंदीचा फटका ॲपल ( Apple ) कंपनीला बसला आहे. लॉकडाऊनमुळे चीनमधील Apple कंपनीचा सर्वात मोठा कारखान्यात नवीन उत्पादनं बनवण्यावर तात्पुरती मर्यादा घातली आहे. त्यामुळे आयफोन तयार करण्यावर ( iPhone Production ) याचा परिणाम झाला आहे. आयफोन प्रोडक्शन थांबल्यामुळे कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.
चीनमधील लॉकडाऊनचा Apple ला फटका
चीनमध्ये नव्याने लागू झालेल्या कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेक मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. आयफोन बनवणारी कंपनी ॲपलही या टाळेबंदीच्या कचाट्यात सापडली आहे. रविवारी जारी केलेल्या निवेदनात ॲपल कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी चीनमधील त्यांच्या असेंब्ली प्लांटमध्ये आयफोन 14 चे उत्पादन तात्पुरतं कमी केलं आहे. यामुळे ग्राहकांना नवीन आयफोनची वाट पाहावी लागणार आहे. याचा परिणाम नाताळपूर्वीच्या आयफोन शिपमेंटवर होऊ शकतो. या निर्णयाचा ॲपलच्या तिमाही विक्रीवर देखील लक्षणीय परिणाम होणार असून ग्राहकांच्या ॲपलच्या हाय-एंड मॉडेल्सच्या वापरावरही ब्रेक बसेल.
जगातील सर्वात मोठ्या Apple फॅक्ट्रीत हजारो कर्मचारी कोरोनाबाधित
चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहता सरकारने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. चीनमध्ये Apple ची सर्वात मोठी मॅन्यूफॅक्चरिंग युनिट म्हणजे सर्वात मोठा कारखाना आहे. चीनने झेंग्झू येथील जगातील सर्वात मोठ्या आयफोन प्लांटमध्ये हजारो कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी कंपनीने नियमांमध्ये बदल केला असून येथील प्रोडक्शनही कमी केले आहे. त्यामुळे आता फॉक्सकॉन प्लांटमधील आयफोन तयार करण्यावर तात्पुरते निर्बंध घालत प्रोडक्शनचं प्रमाण कमी करण्यात आलं आहे. यामुळे आयफोनच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Workers have broken out of #Apple’s largest assembly site, escaping the Zero #Covid lockdown at Foxconn in #Zhengzhou. After sneaking out, they’re walking to home towns more than 100 kilometres away to beat the Covid app measures designed to control people and stop this. #China pic.twitter.com/NHjOjclAyU
— Stephen McDonell (@StephenMcDonell) October 30, 2022
प्लांटमधील कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चीनमधील Apple च्या याच फॅक्ट्रीमधील कामगारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये Apple फॅक्ट्रीतील फॉक्सकॉनचे कर्मचारी चक्क पळ काढताना दिसत आहेत. चिनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चिनी कामगार कारखान्यातून पळून जाताना दिसत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे फॉक्सकॉनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. त्यामुळे क्वारंटाईन आधी कर्मचाऱ्यांनी पळ काढायचं ठरवलं