एक्स्प्लोर
VIDEO : झुलणारा भलामोठा पाळणा कोसळून मृत्यू
अनेकांना अशा राईडमध्ये बसून थरार आणि मज्जा अनुभवण्याची आवड असते. पण हा थरार कधी कधी जीवावर बेतू शकतं,
ओहिओ : अमेरिकेतील ओहिओ शहरात राईड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून ही दृश्यं काळजाचा थरकाप उडवणारी आहेत.
ओहिओ स्टेट फेअरमध्ये बुधवारी लोक 'द फायर बॉल अम्युझमेंट राईड'मध्ये बसून थरार अनुभवत होते. पण याचवेळी एक दुर्दैवी घटना घडली. हा पाळणा हवेत झोकावत असताना एका खांबाला जोरदार धडकला. यामुळे पाळण्याचा काही भाग थेट 50 फूट खाली कोसळला.
या दुर्घटनेत एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
द फायर बॉल राईड हे पेंडूलमसारखं असून ते एकाबाजूने दुसऱ्या जातं. ही राईड झुलताना जमिनीपासून 40 फूट उंच जातं आणि एक मिनिटांत 13 फेऱ्या होतात. या राईडमध्ये चार सीटचे सहा सेक्शन असतात.
अनेकांना अशा राईडमध्ये बसून थरार आणि मज्जा अनुभवण्याची आवड असते. पण हा थरार कधी कधी जीवावर बेतू शकतं, हे ओहिओतील दुर्घटनेवरुन समोर आलं आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement