एक्स्प्लोर
Advertisement
25 वर्षांच्या संसारानंतर 'अमेझॉन'च्या संस्थापकांचा घटस्फोट
54 वर्षीय जेफ बेझॉस हे 2018 मध्ये 112 बिलियन डॉलर (अंदाजे 7 लाख 90 हजार 552 कोटी रुपये) संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.
मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि 'अमेझॉन.कॉम'चे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस पत्नीपासून विभक्त होत आहे. 25 वर्षांच्या संसारानंतर जेफ यांनी पत्नी मॅकेन्झी बेझोसला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. बेझोस यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली.
नातं जपण्याचा दीर्घ काळ प्रयत्न केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक प्रोजेक्ट्स आणि संयुक्त उपक्रमांमध्ये भागीदार राहण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. यापुढेही मित्र राहण्याचा विश्वास दोघांना वाटतो. जेफ-मॅकेन्झी यांना चार मुलं आहेत.
54 वर्षीय जेफ बेझॉस हे 2018 मध्ये 112 बिलियन डॉलर (अंदाजे 7 लाख 90 हजार 552 कोटी रुपये) संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मायक्रोसॉफ्टला मागे टाकत अमेझॉन गेल्या आठवड्यात वॉल स्ट्रीटमध्ये सर्वाधिक मूल्य असलेली कंपनी ठरली होती.
48 वर्षीय मॅकेन्झी बेझॉस या प्रसिद्ध लेखिका आहेत. न्यू यॉर्कमध्ये नोकरीच्या मुलाखतीवेळी जेफ आणि मॅकेन्झी यांची पहिल्यांदा भेट झाली होती.
— Jeff Bezos (@JeffBezos) January 9, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement