एक्स्प्लोर

Afghanisthan : अफगाणिस्तानात अन्नासाठी मुलं आणि किडनी विकण्याची वेळ; लोक गरिबी, बेरोजगारीने त्रस्त

Afghanisthan Crisis : अफगाणिस्तानची परिस्थिती बिकट झाली आहे. इथे लोकांना दोन वेळेच्या जेवणासाठी आपली मुलं आणि किडनी विकावी लागत आहे.

Afghanisthan Crisis : तालिबानच्या ताब्यात आल्यापासून अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. वाढती गरिबी, बेरोजगारी, उपासमारी यामुळे येथील परिस्थिती हलाखीची होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांवर कर्जाचा बोजाही वाढत आहे. लोक  दोन वेळच्या भाकरीसाठी काहीही करायला तयार आहेत. अफगाणिस्तानातील लोकांना त्यांची मुले आणि किडनीही विकावी लागत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

एका अहवालानुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आपली किडनी विकली आहे. दोन वेळेच्या अन्नासाठी त्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे. काहींनी तर एक लाख ते चार लाख रुपयांना आपली किडनी विकली आहे. मात्र त्यांना मिळालेले बहुतांश पैसे कर्ज फेडण्यात गेले आहेत. घर चालवण्यासाठी लोक रस्त्यावर भीक मागू लागले आहेत तर, काही लोक पैशासाठी आपली मुलेही विकायला तयार आहेत.

अफगाणिस्तानातील सुमारे 4 दशलक्ष मुले कुपोषित
संयुक्त राष्ट्राने दावा केला आहे की, अफगाणिस्तानातील सुमारे चार दशलक्ष अफगाण बालके कुपोषणाने प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यापैकी 2022 मध्ये 1 लाख 37 हजार मृत्यू होऊ शकतात. युएनच्या शिष्टमंडळाने सांगितले आहे की, किमान 18 दशलक्ष अफगाण नागरिकांना अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागत असून त्यापैकी 9 दशलक्ष लोकांना अन्नाची नितांत गरज आहे.

युएन ऑफिस ऑफ ऑपरेशन्स अँड अॅडव्होकेसीच्या डायरेक्टर रीना घेलानी यांनी सांगितले की, 'आम्हाला तेथील लोकांशी अधिक संवाद साधण्याची आणि त्यांच्या तक्रारी ऐकण्याची गरज आहे. जेणेकरून आम्ही सर्व अफगाण लोकांना त्या नेमक्या समस्यांबद्दल विचारू शकू आणि समस्यांचे निवारण करु शकू.' 

तालिबानचा ताबा घेतल्यापासून 86 अफगाण रेडिओ स्टेशन बंद
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानमध्ये सुमारे 86 रेडिओ स्टेशनचे कामकाज बंद झाले आहे. आकडेवारीच्या आधारे, 300 हून अधिक विविध प्रकारच्या मीडिया संस्था बंद झाल्या आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Embed widget