एक्स्प्लोर
तैवानमध्ये भीषण बस अपघात, 32 पर्यटकांचा मृत्यू
तैपेई : तैवानमध्ये झालेल्या भीषण बस अपघातात 32 पर्यटकांना प्राण गमवावे लागले आहेत. चेरी ब्लॉसम पाहून परतणाऱ्या प्रवाशांची बस हायवेवर अपघातग्रस्त झाली. गेल्या 30 वर्षांतला तैवानमधील हा सर्वात भयंकर अपघात मानला जात आहे.
ताईचुंग प्रांतात ऋतुमानानुसार चेरी ब्लॉसमची फुलं फुलतात. चेरी ब्लॉसम शेत पाहून तैवानी पर्यटक घरी परतत होते. त्यावेळी तैपेईमध्ये बस मुख्यमार्गावरुन बाजुला गेली. हा अपघात इतका भीषण होता, की बसचं छत फाटून प्रवासी बाहेर फेकले गेले.
अपघाताच्या वेळी बस अतिवेगात होती का, याचा तपास पोलिस करत आहेत. 32 जण अपघातात मृत्युमुखी पडले असून 12 जणांवर उपचार सुरु आहेत. सर्व तैवानी नागरिक असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement