एक्स्प्लोर

जवळ मास्क्ड आधार कार्ड असेल तर कधीच होणार नाही फसवणूक; जाणून घ्या कसे डाऊनलोड करावे?

आधार कार्डच्या मदतीने तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुमच्याजवळ मास्क्ड आधार कार्ड असणे गरजेचे आहे. मास्क्ड आधार कार्डचे अनेक फायदे आहेत.

मुंबई : आजकाल शासकीय कार्यालयापासून ते कोणत्याही खासगी कामासाठी आधार कार्ड (Aadhaar card) हे मागितले जाते. आधार कार्डची प्रत दिल्याशिवाय कोणतेही शासकीय किंवा खासगी काम होतच नाही. एखाद्या हॉटेलमध्ये राहायचे असले तर हॉटेलचा मालक तुम्हाला आधार कार्डची प्रत मागतो. आपण दिलेल्या याच आधार कार्डच्या मदतीने आपलीच अनेकवेळा फसवणूक होऊ शकते. आर्थिक पातळीवरही मोठा फटका बसू शकतो. अशीच अडचण येऊ नये, यासाठी मास्क्ड आधार कार्ड हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मास्क्ड आधार कार्ड (Masked Aadhaar Card) वापरल्यास समोरच्या व्यक्तीला तुमच्या आधार कार्डचा दुरुपयोग करता येणार नाही. त्यामुळे मास्क आधार कार्ड म्हणजे काय? ते कसे डाऊनलोड करावे? हे जाणून घेऊ या...

मास्क्ड आधार कार्ड म्हणजे काय? (What is Masked Aadhaar Card)

मास्क्ड आधार कार्ड हे सामन्या आधार कार्डप्रमाणेच असते. या आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून करता येतो. या मास्क्ड आधार कार्डमध्ये पहिले आठ आकडे लपवण्यात आलेले असतात.  म्हणजेच मास्क्ड आधार कार्डवर तुमच्या आधार नंबरमधील सुरुवातीचे आठ अंक दिसत नाहीत. समोरच्या व्यक्तीला मास्क्ड आधार कार्डवर शेवटचे फक्त चार अंकच दिसतील.  तुमचा आधार नंबर लपलेला असल्यामुळे तुमची इतर माहिती आपोआपच सुरक्षित होते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला, संस्थेला किंवा हॉटेलवर मास्क्ड आधार कार्ड दिले तरीही त्याचा दुरुपयोग करता येत नाही. मास्क्ड आधार कार्ड हे तुमच्या सामान्य आधार कार्डचेच एक व्हर्जन असते. प्रवासादरम्यान तुम्ही या आधार कार्डचा वापर करू शकता. हॉटेल बुक करण्यासाठीही या आधार कार्डचा वापर करता येतो. विमानतळावरही या आधार कार्डचा वापर करता येतो. 

मास्क्ड आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे? (who to download Masked Aadhaar Card)

>>>> मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वांत अगोदर UIDAI च्या https:uidai.gov.in  या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 
त्यानंतर माय आधार या ऑप्शनवर क्लिक करावे. 

>>>> त्यानंतर आधार कार्डचा नंबर टाकून कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपी या ऑप्शनवर क्लीक करावे लागेल.

>>>> ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी जाईल. 

>>>> हा ओटीपी UIDAI च्या संकेतस्थलावर टाकून डाऊनलोड हा ऑप्शन निवडावा. 
 
>>>> त्यानंतर चेकबॉक्समधील डाऊनलोड मास्क्ड आधार या ऑप्शनवर क्लिक करावे. 

>>>> मास्क्ड आधार या ऑप्शनवर क्लिक करून सबमिट या पर्यायाला सिलेक्ट करावे. 

>>>> त्यांतर तुमचे मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड होईल. तुमचे मास्क्ड आधार हे पासवर्ड सिक्योर असेल. पासवर्ड म्हणून तुम्हाला तुमच्या  इंग्रजीतील नावाचे चार अक्षरं तसेच जन्मतारखेचा महिना आणि वर्ष टाकावे लागेल. 

हेही वाचा :

Aadhaar Free Update: विसरला असाल, तर वेळेत करुन घ्या आधारबाबतचं 'हे' काम; फक्त 6 दिवस बाकी, डेडलाईन संपल्यानंतर....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?
मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?
Uddhav Thackeray : माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha News : राहुल गांधींचा दौरा ते खोतकर-दानवे भेट; राजकीय घडामोडींचा आढावा #abpमाझाABP Majha  Headlines : 1 PM : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 11 NOV 2024Ajit Pawar on Mahayuti : महायुतीला विधानसभेत किती जागा मिळणार? अजित दादा म्हणतात..Amit Thackeray vs Mahesh Sawant :बालीश बोलणाऱ्या महेश सावंतांना अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर,म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
माढ्यात बबनदादा शिंदेंना मोठा झटका, अभिजीत पाटलांनी शिंदेंची खास माणसं फोडली
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवर नवाब मलिकांचा एका शब्दात समाचार; भाजपला दाखवला आरसा
मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?
मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?
Uddhav Thackeray : माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
माझी बॅग तपासली तशी दाढीवाल्या मिंद्याची मोदी, शाह, गुलाबी जॅकेट, टरबूजची बॅग तपासली का? उद्धव ठाकरेंची खोचक टीका
Maharashtra Assembly Elections 2024 : एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
एकनाथ शिंदेंनी सभेला नकार देताच उमेदवाराला प्रचंड टेन्शन, ब्लडप्रेशर वाढल्याने रुग्णालयात दाखल
Raju Shetti : ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी
ज्यांना जायचं होतं त्यांनी केवळ तिसऱ्या आघाडीचे कारण दिले, टोळकं होतं ते निघून गेल्याने आता कार्यकर्ते माझ्याशी खुलेपणाने चर्चा करतील : राजू शेट्टी
IANS- MATRIZE Survey: तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार की नाही? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार की नाही? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
Embed widget