Wrdha : आजनसरा देवस्थानाला पुराचा मोठा फटका, कार्यालयातील इलेक्ट्रिक वस्तू प्लायवूड आणि इतर वस्तू भिजल्याने नुकसान
Wardha : परिसरात चिखल, मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरल्याने मंदिर प्रशासनाकडून परिस्थिती पूर्ववत करण्याचं कार्य सुरू
Wardha : हिंगणघाट तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथील श्री संत भोजाजी महाराज देवस्थानात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्यामुळे मंदिराचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कार्यालयातील कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक सामान, सीसीटीव्ही मशीन, प्लायवूड यासह अनेक वस्तूंचे नुकसान झाल्यामुळे आता देवस्थानातील कर्मचाऱ्यांकडून मंदिराची साफसफाई केली जात आहे. मंदिराच्या मागे वर्धा आणि यशोदा नदीचा संगम आहे त्यामुळे यावर्षी मुसळधार पाऊस बरसल्यामुळे नद्यांना पूर आला आणि पुराचे पाणी हे थेट मंदिर परिसरासह समाधी गभऱ्यातही शिरलं आणि परिसरासह कार्यालयाचं देखील मोठं नुकसान केलं आहे.परिणामी भाविकांना सुद्धा दर्शनासाठी जाणं कठीण झालं आहे. बाहेरून नमस्कार करून समाधान मानावे लागत आहेत.
कोरोना काळात इतरांना मदत करणाऱ्या संस्थेलाच आता शासनाच्या मदतीची गरज?
विशेष म्हणजे लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात श्री संत भोजाजी महाराज देवस्थानाच्या वतीने शासनाला 50 लाखांच्या वर आर्थिक सहायता आणि रोजगार हिरावल्या गेलेल्या नागरिकांनाही अन्नधान्य पुरवण्याचं मोलाचं काम केलं होतं.. आणि आता याच संस्थेला शासनाच्या मदतीची गरज असल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे...सर्व कर्मचाऱ्यांकडून सध्या मंदिराची साफसफाई केली जात आहे... आजनसरा देवस्थानाचा पूर्ण परिसर हा पाण्याखाली गेला होता.. आता पूर ओसरला आहे, मात्र मंदिर परिसर हा पूर्णपणे चिखलमय झालेला आहे... परिस्थिती पूर्ववत करण्याचं काम मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे..
100 क्विंटलच्या वर रोज होणारा पुरणपोळीचा स्वयंपाक थांबला :
आजनसरा देवस्थान हे विदर्भातच नाही तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून या ठिकाणी राज्यभरातून महिन्याला जवळजवळ पाच लाख भाविक पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी येत असतात,,येथे रोज भाविकांकडून 100 क्विंटल च्या वर पुरणाचा प्रसाद तयार होतो..मात्र या महापुरामुळे सर्व स्वयंपाकाचे शेड पाण्याखाली गेल्याने खराब झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे, परिणामी भाविकांनाही स्वयंपाकासाठी सोय उरलेली नाही.ही सर्व परिस्थिती पूर्ववत करत मोठा कालावधी लागणार असून भाविकांना स्वयंपाक करण्यासाठी अडचणी येऊ शकतात..
सेवाभावी संस्थेवर 70 जणांचे रोजगार अवलंबून :
श्री संत भोजाजी महाराज अजनसरा येथील मंदिर परिसरात गोर गरिबांच्या आरोग्यासाठी धर्मार्थ दवाखाना आणि एक आश्रय वृद्धाश्रम देखील आहेत,या वृद्धाश्रमात 17 निराधार वृद्धांना आश्रय देण्यात आला आहे..यासह अन्नदानाचं मोलाचं कार्य अविरत येथून केलं जातं.संस्थेवर एकूणच 70 जणांचा रोजगार अवलंबून असून या पुरामुळे सर्वांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे...अशी ही सेवाभावी संस्था महापुरामुळे संकटात आली असून शासनाकडे आर्थिक मदतीच्या मागणीसाठी मजबूर झालीय.