एक्स्प्लोर

पाठीशी उभा होता विठू... मद्यधुंद चालक आणि वाहक, एसटी थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली; वर्ध्यात वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात!

Wardha Varkari Bus Accident : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला  वारकरी जात असतात. वर्ध्यावरुन वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या एसटी बसचा भीषण अपघात. सुदैवानं मोठा अनर्थ टळला.

Wardha Varkari Bus Accident : वर्धा : विठ्ठल भेटीच्या ओढीनं लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले आहेत. आज संध्याकाळपर्यंत राज्यभरातून (Maharashtra News) सर्व पालख्या पंढरपुरात (Pandharpur News) दाखल होतील. तर काही गावांतून वारकरी बसनं पंढरपूरकडे निघाले आहेत. अशातच वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरकडे निघालेल्या बसचा अपघात (Accident News Updates) झाल्याती बातमी समोर येत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात 5 जण दगावले आहेत. तर, आता वर्ध्यातून (Wardha News) पंढरपूरकडे निघालेल्या बसलाही अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला  वारकरी जात असतात. वर्ध्यावरुन वारकऱ्यांना घेऊन एसटी (बस क्रमांक MH 14 BT 4676) पंढरपूरच्या दिशेनं निघाली होती. मध्यरात्री या एसटीचा भीषण अपघात झाला. वर्ध्याहून निघालेल्या एसटीचा पुसदजवळ अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, 45 वारकऱ्यांना घेऊन निघालेल्या एसटीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलं आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यानं पुसदमधील माहुर फाट्यावर सुधाकर नाईक पुतळ्याजवळ एसटी एका डिव्हायडरला जाऊन आदळली. एसटीनं डिव्हायडरला एवढ्या जोरात धडक दिली की, आतमध्ये बसलेले वारकऱ्यांना हादरले बसले. 

एसटीनं डिव्हायडरला दिलेली धडक एवढी जोरदार होती की, आतमध्ये बसलेले सर्व प्रवासी घाबरले होते. एसटी हादरल्यानंतर आतमध्ये बसलेल्यांना जोरदार हादरे बसले होते. अपघातानंतर एसटी जागेवरच थांबली त्यामुळे मोठी जीवीतहानी टळली. एसटी थांबल्यानंतर आतमध्ये बसलेले वारकरी पटापट एसटी बाहेर पडले. एक वयोवृद्ध महिला आणि एका तरुणाला या अपघातात दुखापत झाली असून त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत एसटी चालवत असल्यामुळे हा भीषण अपघात घडला. एवढंच नाहीतर, चालकासोबत वाहकही मद्यधुंद असल्याचं वारकऱ्यांना आढळून आलं. 

दरम्यान, विठुराया पाठीशी होता म्हणूनच आपण बचावलो, असं एसटी बसमधील वारकऱ्यांचं म्हणणं आहे. पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत, अपघाताची चौकशी सुरू केली आहे. 

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात

विठ्ठलाच्या ओढीनं सर्व वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्बल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये 54 वारकरी होते. यातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Accident On Mumbai Pune Expressway : पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घाला; 5 जण दगावले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Andhrapradesh Fire : बिडी पेटवली, काडी फेकली अन् भडका उडाला; धक्कादायक व्हिडीओ ABP MajhaZero Hour Manoj Jarange : 700 ते 800 उमेदवार इच्छुक, मनोज जरांगे यांनी विधानसभेचा प्लॅन ठरवला?ABP Majha Headlines : 08 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake : Eknath Shinde Manoj Jarange यांच्यासाठी रेड कार्पेट टाकतात, हाकेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
बदलापूर प्रकरणात 'तो' चुकीचा मेसेज पसरवणाऱ्या 21 वर्षीय तरुणीस अटक, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
खूशखबर! बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये बंपर भरती, आजच अर्ज करा!
खूशखबर! बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये बंपर भरती, आजच अर्ज करा!
Embed widget