एक्स्प्लोर

Accident On Mumbai Pune Expressway : पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसवर काळाचा घाला; 5 जण दगावले

Accident On Mumbai Pune Expressway : विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी पालख्या पंढरीकडे मार्गक्रमण करत आहेत. अनेक पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या असून काही पालख्या आज रात्रीपर्यंत पंढरपुरात दाखल होणार आहेत.

Accident On Mumbai Pune Expressway : नवी मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे. डोंबिवलीवरून (Dombivli) पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा अपघात (Accident of Travels) झाला आहे. या ट्रॅव्हल्समधून एकूण 54 वारकरी प्रवास करत होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, 20 ते 30 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

विठ्ठलाच्या नामघोषात आषाढी एकादशीसाठी पालख्या पंढरीकडे मार्गक्रमण करत आहेत. अनेक पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या असून काही पालख्या आज रात्रीपर्यंत पंढरपुरात दाखल होणार आहेत. अशातच राज्यभरातून अनेक वारकरी आषाढीसाठी पंढरपुराच्या दिशेनं जात आहेत. डोंबिवलीवरुन निघालेल्या अशाच एका वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. 

विठ्ठलाच्या ओढीनं सर्व वारकरी पंढरीच्या दिशेनं निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन ट्रॅव्हल्स पंढरपूरच्या दिशेनं जात असताना भीषण अपघात झाला. वारकऱ्यांच्या ट्रॅव्बल्ससमोर एक ट्रॅक्टर जात होता. ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्स जाऊन आदळली. पुढे ट्रॅव्हल्स अनिंयंत्रित होऊन थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये 54 वारकरी होते. यातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना एमजीएम रूग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आलाच कसा? पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतलं सरन्यायाधीशांच्या घरच्या बाप्पाचं दर्शनABP Majha Headlines : 10 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane Vs Ajit Pawar : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं सांगताना नितेश राणेंची जीभ घसरलीUlhas Bapat on CJI Chandrachud : सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर ती चूकच!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget