एक्स्प्लोर

Wardha : मेडिकलवाल्याकडून लाच मागितली, दलालाने स्वीकारली; वर्ध्यात सात हजारांच्या लाचेसह औषध निरीक्षकास अटक

Wardha Bribe Case : औषध निरीक्षक सतीश चव्हाण आणि दलाल प्रवीण पाथरकर हे या लाचप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. 

वर्धा: जिल्ह्यातील एका मेडिकलच्या औषध विक्रेत्याकडून सात हजार रुपयांची लाच (Bribe)स्वीकारताना अन्न आणि औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकाला (Drug And Food Inspector) दलालासह रंगेहात अटक करण्यात आली आहे. नागपूर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने (Nagpur Anti Corruption Bureau) ही कारवाई केली आहे. सतीश हरिसिंग चव्हाण असं या औषध निरीक्षकाचं नाव आहे.

वर्ध्याच्या अन्न  औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकाने मेडिकल औषध विक्रेत्याकडून दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी सात हजारांची रक्कम स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. वर्ध्यातील एका औषध विक्रेत्याकडे निरीक्षण करण्यासाठी औषध निरीक्षक सतीश हरिसिंग चव्हाण आला होता. दरम्यान निरीक्षणाचा अहवाल हा तक्रारदार असलेल्या औषध विक्रेत्याच्या बाजूने करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. 

वर्ध्याच्या केळकरवाडी येथील प्रवीण यादवराव पाथरकर या दलालाने सात हजार रुपयांची ही लाचेची रक्कम स्वीकारली. सापळा रचलेल्या पथकाने दलाल पाथरकर याला रंगेहात अटक केली. तर औषध निरीक्षक सतीश चव्हाण याला देखील लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. दोघांच्याही घराची झाडाझडती घेतली जात आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सुरू असलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहात ही कारवाई झाल्याने सर्वांचे लक्ष या करवाईकडे वेधले गेले आहे.

पालघरमध्ये सरकारी वकील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

एका पोलीस कर्मचाऱ्याकडून लाच घेणाऱ्या सरकारी वकिलाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वर्ग  1  (सरकारी वकील) सुनील बाबुराव सावंत यांना 7000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधकविभागाकडून हुतात्मा स्तंभाजवळ रंगेहाथ पकडण्यात आले. सावंत हे गेल्या सात वर्षांपासून पालघर येथील नायालयात सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत होते.

पालघर जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक यांच्यावर सन 2015 मध्ये तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 3/ 15 कलम 376 भादंविप्रमाणे दाखल होता. जून 2023 मध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोषमुक्त करण्यात आले होते. पालघर जिल्हा पोलीस दलाकडून तक्रारदार पोलीस कर्मचाऱ्याने पदोन्नतीसाठी अर्ज केला होता. त्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) पालघर त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून निर्दोष सुटल्याबाबत अहवाल मागण्यात आला होता. तो अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यासंबंधी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोड करण्यात आली आणि 7000 रुपये लाचेची रक्कम ठरवण्यात आली. ती रक्कम स्वीकारताना  लाच लुचपत प्रतिबंधक  विभागाकडून हुतात्मा स्तंभा जवळ रंगेहाथ पकडण्यात आले.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Kolhe Shirur Loksbaha Voting : माझं लीड कीती हे मतदार राजा सांगेल : अमोल कोल्हेShirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादThane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP MajhaJalgaon Loksabha Voting Center : मतदान केंद्रावर बालसंगोपन, महिला मतदात्यांचा टक्का वाढीसाठी प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Embed widget