एक्स्प्लोर

Wardha News : दहशत माजवणाऱ्या गुंडाच्या अटकेसाठी शेकडो नागरिक सरसावले, तळेगाव पोलीस ठाण्यावर धडकले

Wardha News : गुंडाला अटक करण्यासाठी तळेगावात शेकडो नागरिक पोलीस स्टेशनवर धडकले. वादाचा वचपा काढण्यासाठी या गुंडाने सीआरपीएफ जवानाच्या घरावर तलवारीने हल्ला चढवला होता.

Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील तळेगाव इथे काल (25 ऑक्टोबर) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला. शेकडो नागरिकांचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला आणि याला कारण ठरलं एका सीआरपीएफ (CRPF) जवानाला झालेली शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. गुंडाला (Goon) अटक करण्यासाठी तळेगावात शेकडो नागरिक पोलीस स्टेशनवर धडकले. वादाचा वचपा काढण्यासाठी या गुंडाने सीआरपीएफ जवानाच्या घरावर तलवारीने हल्ला चढवला होता. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही.

तळेगाव इथला अमित घावडे हा युवक सीआरपीएफमध्ये सेवा देत असून तो सध्या रजेवर गावी आला होता. दिवाळी असल्याने तो सोमवारी (24 ऑक्टोबर) फटाक्यांच्या दुकानजवळ उभा असताना तिथलाच अण्णा सिंग बावरी हा गुंड मद्यप्राशन करुन आला. यावेळी त्याचा दुकानदाराशी वाद झाला. तेव्हा वाद सोडवण्यासाठी सीआरपीएफ जवान अमित घावडे याने वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. वाद शांत झाला मात्र दुसऱ्या दिवशी वचपा काढण्यासाठी हातात तलवार घेऊन जवानाच्या घरावर धडकला. या घटनेने पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.

त्यामुळे गावात दहशत निर्माण करणाऱ्या या गुंडाला अटक करण्याच्या मागणीसाठी गावातील शेकडो नागरिकांनी तळेगाव पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांची अधिक कुमक बोलवण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर त्या गुंडाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यानंतर जमाव शांत झाला. परंतु या घटनेने तळेगावात मात्र काही वेळ ताणतणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तळेगावात खुनाचा थरार
यापूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तळेगावातच हत्येचा थरार रंगला होता. वर्धा इथल्या तळेगाव (शा.पंत) इथे 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्री नागरिक गाढ झोपेत असताना येथील प्रसिद्ध सत्याग्रही घाटाच्या परीसरात खुनाचा थरार घडला आहे. धक्कादायक म्हणजे मारेकरी खून करुनच थांबले नाही तर ज्या ट्रक चालकाचा खून केला तो ट्रकच चोरुन नेल्याची दुर्दैवी आणि तितकीच भयानक घटना घडली होती. चक्रधरसिंह रामसजीवनसिंह असं मृत चालकाचं नाव आहे. तर आरोपी सुनील गामा भारद्वाज (रा. वलनी खदान सावनेर जि. नागपूर) याला पोलिसांनी अटक केली.

इतर महत्त्वाची बातमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget