एक्स्प्लोर

Wardha News: मदतीसाठी कार थांबताच भरधाव टिप्परने चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी 

Wardha: उभ्या टिप्परला धडकलेल्या दुचाकीवरील एकाला उचलण्यासाठी मदत करणाऱ्या कारचालक आणि दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात  तिघांचा जागीच मृत्यू झालाय.

Wardha News : रस्त्यावर उभ्या नादुरुस्त टिप्परला धडकलेल्या दुचाकीवरील एकाला उचलण्यासाठी मदत करणाऱ्या कार चालक आणि दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात (Accident) तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री सात वाजताच्या सुमारास हिंगणघाट (Wardha News) तालुक्यातील वडनेरपासून अडीच किमी अंतरावर असलेल्या मानकापूर चौरस्त्यावर घडली.

तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी 

वडनेर शिरसगाव रोडवर सुरकार यांचे शेताजवळ एक टिप्पर सकाळपासुनच उभा होता. या उभ्या टिप्परला एक मोटर सायकलस्वार येउन धडकला. दरम्यान, या अपघातात खाली पडलेल्या मोटरसायकलस्वाराला उचलण्यासाठी तेथुन जाणाऱ्या एक मोटरसायकलस्वाराने आणि कारचालकाने कार थांबवत अपघातग्रस्त मोटरसायकलस्वाराला उचलण्यासाठी धावले. तितक्यात वडनेर कडून येरणगावकडे जाणाऱ्या एका दुसऱ्या भरधाव टिप्परने अचानक धडक दिली. या टिप्परचालकाला वेग नियंत्रित करता न आल्याने त्याने उभ्या टिप्परला आणि तेथे मदतीसाठी उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडले. यात तीन जण जागीच ठार झाले असून दोघ गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

या अपघातात गंभीर जखमी दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र अचानक झालेल्या या विचित्र अपघतामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना (Wardha Police) या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थाळ गाठत पुढील चौकशी सुरू केली आहे. सध्या या प्रकरणाच्या अधिक तपास वडनेर पोलीस करीत आहे.

भर रस्त्यात उभ्या कारनं घेतला पेट; अकोल्यातली घटना

अकोल्यात भर रस्त्यात उभ्या कारनं अचानक पेट घेतला आहे. अकोला शहरातील फतेह चौक परिसरात ही घटना घडली. आज दुपारच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधून धुर निघत असल्याचे दिसून आले. नागरीकांनी जवळ जाऊन बघितले असता, कारनं अचानक पेट घेतला. नागरीकांनी आग विझण्याचा प्राथमिक प्रयत्न केला, परंतु कार लागलेली आग वाढत असल्याचे दिसतात नागरिकांनी माघार घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाला या संदर्भात माहिती देताच घटनास्थळी एक गाडी दाखल झाली आणि आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून ही आग कारच्या इंजिनमध्ये स्पार्किंग झाल्यानं लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मेळघाटमध्ये बसला भीषण अपघात; तिघांचा मृत्यू 35 प्रवासी जखमी 

अमरावतीच्या मेळघाटमध्ये बस खाईमध्ये उतरल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्राथमिक माहिती नुसार बसचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. हा अपघात आज 24 मार्चच्या दुपारच्या सुमारास सेमाडोह - घटांग रस्त्यावर झालाय. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय  तर 35 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. अपघाताची माहिती मिळातच जखमी रुग्णांना तातडीने सेमाडोह रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 14 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6.30 AM : 14 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
Embed widget