(Source: ECI | ABP NEWS)
Wardha Crime : वर्ध्याच्या भर रस्त्यावर परिचारिकेवर प्राणघातक हल्ला; संतप्त जमावाने पाठलाग करताच मारेकरी थेट पोलीस ठाण्यात शिरला, अन्....
Wardha Crime News : वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

Wardha Crime News : वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कटरने हातावर घाव मारत यात परिचारिकेला गंभीर स्वरूपात जखमी केलंय. तर आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढलाय. मात्र जमाव पाठीमागे लागल्याने अखेर तरुणाने रस्त्यावरच असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात प्रवेश घेत शरणागती पत्करली. मोठा जमावाने पाठलाग सुरु केल्याने आणि त्यातून सुटका होणार नाही या धारनेतून त्याने थेट रामनगर पोलीस ठाण्यात शरण घेतली. त्यामुळे मारेकरी संतप्त जमावाच्या तावडीतून बचावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना वर्धा शहराच्या मध्य भागात असलेल्या रस्त्यावर घडली आहे.
तरुणाने जवळ असलेले कटर काढलं अन् परिचारिकेवर सपासप वार
पुढे आलेल्या माहितीनुसार, एका खाजगी रुग्णालयात 24 वर्षीय तरुणी परिचारिका म्हणून काम करीत होती. रुग्णालयाजवळ असलेल्या रस्त्यावर तिला तरुण भेटला, काही वेळानंतर अचानक तरुणीसोबत बोलत असलेल्या सौरभ रवींद्र क्षीरसागर (वय 29 राहणार भुगाव) या तरुणाने जवळ असलेले कटर बाहेर काढले आणि तिचेवर सपासप वार करीत तिला गंभीर जखमी केले. ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आणि मारेकरी सौरभला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र इतक्यात जमाव अधिक जमल्याने भयभीत झालेल्या आरोपी सौरभने घटनास्थळावरुन पळ काढला. तेथील आजूबाजूच्या नागरिकांनी पाठलाग केल्याने त्याने अखेर रामनगर पोलीस ठाण्यात बचावासाठी शरनागती पत्करली. या प्रकरणी अद्याप वर्धा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पूढील कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वर्ध्यात राष्ट्रीय महामार्गाला दुसऱ्यांदा पडले मोठे भगदाड, बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
वर्ध्याच्या हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 ला नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर चार वर्षांत दुसऱ्यांदा मोठा खड्डा पडलेला आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देतो आहे. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहेय. तर रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहेय.
इतर महत्वाच्या बातम्या
























