Vidarbha Weather Update:राज्यात तापमानात सातत्याने वाढ, तर पुढील 3 दिवस विदर्भात दमदार पावसाच्या सरी; हवामान विभागाचा अंदाज काय?
Vidarbha Weather Update: पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांशी भागात पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.
Vidarbha Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातारणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. अशातच आजपासून पुढील चार दिवस विदर्भातील (Vidarbha)बहुतांशी भागात पावसाचा(Rain)अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या (IMD) वतीने वर्तविण्यात आला आहे. यात प्रामुख्याने पूर्व विदर्भासह अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर, नागपूर, भंडारा, गोंदिया,आणि गडचिरोली जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.
तर 17 ते 19 मार्च दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याचा वारा आणि गारपीटी होण्याचा इशारा देखील नागपूर हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे वातावरणात होणाऱ्या संभाव्य बदलामुळे शेतकऱ्यांसह, कृषि उत्पन्न बाजार समिति, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
काय आहे विदर्भात हवामान विभागाचा अंदाज?
विदर्भात आज 16 मार्च पासून पुढील 19 मार्च पर्यंत विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि गारपीटी होण्याचा इशारा दिला आहे. यात आज, 16 मार्च रोजी नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 प्रती तास वेगाचा सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर 17 मार्च रोजी नागपूरसह अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी प्रती तास वेगाचा सोसाट्याचा वारा आणि यवतमाळ, चंद्रपुर, आणि गोंदिया जिल्ह्यात गारपीटी होण्याचा देखील अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.
तर, अशीच स्थिति 18 मार्चला देखील कायम असणार आहे. 19 मार्चला संभाव्य जोर ओसरून केवळ वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपुर येथे विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी प्रती तास वेगाचा सोसाट्याचा वारा असणार आहे. तर आगामी 5 दिवसात कमाल तापमानात फार बदल होणार नसल्याचे देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नागपूरात अवकाळी पावसाची हजेरी
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविल्या प्रमाणे आज नागपूर शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारपासूनच ढगांनी एकच गर्दी केल्यानंतर जोरदार वादळी वाऱ्यासाह पावसाच्या सरी आज कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेले धान्य,मिरची,धान,तूर,चना इत्यादि पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर नागपूर शहराच्या परिघातील काही भागात अवकाळी पावसासह हलक्या स्वरूपाची गारपीट झाल्याची देखील माहिती पुढे आली आहे. सकाळपासून आकाश निरभ्र आणि तीव्र ऊन जाणवत असताना दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन पाऊसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास वादळी वारा आणि वीजेच्या कडकडाटसह पावसाच्या सरी कोसळल्याने साऱ्यांचीच तारांबळ उडाल्याचे बघायला मिळाले आहे.
असे आहे विदर्भाचे आजचे तापमान
जिल्हे | कमाल | किमान |
अकोला | 38.0 | 20.0 |
अमरावती | 35.2 | 20.5 |
बुलढाणा | 35.5 | 20.0 |
ब्रम्हपुरी | 39.2 | 23.6 |
चंद्रपूर | 39.4 | 22.0 |
गडचिरोली | 36.8 | 20.4 |
गोंदिया | 36.8 | 20.5 |
नागपूर | 36.7 | 21.2 |
वर्धा | 38.0 | 21.9 |
वाशिम | 39.6 | 17.8 |
यवतमाळ | 39.5 | 20.5 |
इतर महत्वाच्या बातम्या