एक्स्प्लोर

Nagpur Lok Sabha 2024 : नितीन गडकारींनी फोडला प्रचाराचा नारळ; ‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’ म्हणत प्रचारासाठी स्वत: मैदानात

खासदार नितीन गडकरी यांनी देखील आपल्या प्रचाराचा नारळ फोडत स्वत: मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे. ‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’ म्हणत गडकारींना तिसऱ्यांदा खासदार करण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

Nagpur : केंद्रीय मंत्री आणि विद्यामन खासदार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपला प्रचाराचा नारळ फोडत स्वत: मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे. ‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’ म्हणत नागपूर भजाप तर्फे नितीन गडकारींना तिसऱ्यांदा खासदार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यात आता नितीन गडकरी यांनी देखील आपली जोरदार तयारी केल्याचे चित्र आहे.  

लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha 2024) पडघम वाजायला सुरुवात होण्यास आता अवघ्या काहीच तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. समाज माध्यमांवर सध्या सुरू असलेले विविध सर्व्हे आणि मतदारांचा कौल बघता यावेळी कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यात भाजपविरुद्ध (BJP) सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे भाजपची काही अंशी दमछाक होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नेते हे स्वत: मैदानात उतरून प्रचार-प्रसार करत आहे.

‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होताच, त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आल्याने नागपूर भाजपमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. यंदा सलग तसऱ्यांदा गडकरी हे नागपूर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. गडकरी यांना नागपूरच्याच गडाचे तिकीट मिळाले असल्याने त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला असून नागपूर भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशातच  भाजपतर्फे नितीन गडकरी यांना  मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जोरदार तयारी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

यावेळी गडकारींनी स्वत: मैदानात उतरून आपला प्रचाराचा नारळ फोडला आहे. ‘कहो दिल से, नितीन गडकरी फिर से’ अशा आशयाचा मजकूर असलेल्या स्प्रे पेंटिंगचे अनावरण गडकरी यांनी केले आहे. नागपूरसह देशभरात गडकरी यांनी गेल्या दहा वर्षांत केलेले विकासकार्य आणि राजकारण विरहित लोककल्याणकारी निर्णयामुळे त्यांची प्रतिमा देशपातळीवर उंचावली आहे. अशातच त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यास विरोधी पक्षात अद्याप कोणीही फार इच्छुक नसल्याचे देखील बोलले जात आहे. सोबतच नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी देखील नागपूरकरांनी केली आहे.  

निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी 

नागपूरातील इतर विरोधीपक्षानी नितीन गडकरी यांच्या विरोधात कुठलाही उमेदवार उभा न करता देशात एक नवा आदर्श उभा करावा. तसेच विकासासोबत सर्वसामान्य जनता कायम उभी असते, हा संदेश देखील या माध्यमातून द्यावा, अशी आग्रही मागणी नागपूरकरांनी केली आहे. या मागणीसाठी नागपूरकर रस्त्यावर उतरून मोहीम राबवत आहेत. या मोहिमेंतर्गत शहरातील मुख्य चौकात हातात 'नागपूरची शान असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बिनविरोध निवड का नाही,' असा आशय असलेला बॅनर घेत आपली भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इतर राजकीय पक्षांनीही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती देखील या नागरिकांनी या मोहिमेतून केली आहे.

नितीन गडकरींमुळे नागपूरात अनेक संस्था आल्या, विकासाची मोठी कामं झाली, यासह त्यांनी देशभरात केलेली विकासाची कामे बघता विकासाच्या आड राजकारण कधीही येऊ न दिल्याने त्यांची प्रतिमा देशभर विकासपुरुष अशी आहे. त्यामुळे राजकरणांपेक्षा विकासाला सर्वस्वी मानणाऱ्या नितीन गडकरी यांची निवड बिनविरोध व्हायला हवी, अशी मागणी नागपूकरांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?Saif Ali Khan Update : सीसीटीव्हीत दिसणारा आणि अटकेतल्या व्यक्तीत साम्य नाही,आरोपीच्या वकिलाचा दावाST Bus Hike : सर्वसामान्यांना झटका!एसटीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Embed widget