माझ्याकडे परमाणु बॉम्ब, एक मत विरोधकांना तर दोन मते भाजपला, विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? उत्तम जानकरांनी दिली माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर नाशिकमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमात बोलताना आमदार उत्तम जानकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं.
Uttam Jankar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर नाशिकमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमात बोलताना आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी विधानसभा निवडणूक निकालाच्या मुद्यावरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. एक मत विरोधी पक्षाला तर दोन मते भाजपला जात होती. हे नेमक कशामुळं झालं याच्या तळाशी मी गेलो आहे असे उत्तम जानकर म्हणाले. राहुल गांधी यांनी जी आत्ता चळवळ सुरू केली तीच चळवळ मला वाटत होती आमच्याकडे चालावी. सुप्रिया सुळे यांनी मार्कडवाडी ते मुंबई निघाला हवं होतं असे जानकर म्हणाले.
42 निवडणुका लढलो, 36 निवडणुका हरलो
मी आयुष्यात एकूण 42 निवडणुका लढलो आहे. 36 निवडणुका मी हरलेलो आहे. मी त्यावेळी निवडणूक आयोगावर कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. 30 ते 35 हजार फरकाने मी निवडणूक जिंकणे अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. राहुल गांधी यांनी 6 महिने अभ्यास केला मी 10 महिने अभ्यास केला. त्यांच्याकडे हायड्रोजन बॉम्ब असल्याचे ते म्हणाले होते, पण माझ्याकडे अणुबॉम्ब पेक्षा सुद्धा मोठा परमाणु बॉम्ब आहे असे उत्तम जानकर म्हणाले. एक मत विरोधी पक्षाला तर भाजपला दोन मते जात होती. हे नेमक कशामुळे झालं याच्या तळाशी मी गेलो. असे उत्तम जानकर म्हणाले.
मार्कडवाडी प्रकरणात मला देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल असं सांगण्यात आलं
मार्कडवाडी प्रकरणात मला देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यावेळी जर एक मत आम्ही मतपत्रिकेवर घेतलं असतं तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता. अनेकवेळा सभागृहात विरोधक गोंधळ घालतात आणि निघून जातात, त्यावेळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येईल अशी बिले पास करुन घेतल्याचे जानकर म्हणाले. विधानसभेला दोनास एक प्रमाण पद्धती वापरली होती असे उत्तम जानकर म्हणाले. युगेंद्र पवार यांना मिळाली 1 लाख 20 हजार मते मिळाली आणि समोरच्या व्यक्तीला मिळाली 1 लाख 80 हजार, म्हणजे 60 हजार मते यांनी समोरच्या व्यक्तीला मिळवून दिली. ज्यावेळी मतदान प्रक्रिये सुरू होती त्यावेळी एक मत युगेंद्र पवार यांना आणि दोन मते समोरच्या व्यक्तीला मिळाली आणि ते विजयी झाल्याचे जानकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर नाशिकमध्ये पार पडत आहे. या शिबीराला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत. या शिबिराला पक्षाचे पाच आमदार आणि दोन खासदार अनुपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान सभेचे 10 आमदार आहेत, त्यापैकी फक्त पाच आमदार हे शिबिराला उपस्थित आहेत.
महत्वाच्या बातम्या:




















