एक्स्प्लोर

ज्यांनी आमदार केले ते शरद पवार आणि विजयसिंह मोहिते कर्णासारखे नाहीत का? शरद पवार गटाच्या नेत्याने उत्तम जानकर यांना डिवचलं

उत्तम जानकर यांना आमदारकी ही शरद पवार आणि विजयसिंह मोहिते यांच्या कृपेमुळे मिळाली. असे असताना एवढे मोठे नेते सोडून राज्याचे एक नेता कर्णासारख दानशूर वाटू लागले का? अशी टीका संकल्प डोळस यांनी केली आहे.

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) हे अलीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या चांगल्याच प्रेमात पडल्याचे दिसत होते. यावरून आता त्यांना त्यांच्याच पक्षाच्या संकल्प डोळस (Sankalp Dolas) यांनी चांगलेच डिवचले आहे. नातेपुते येथे होलार समाजाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्णासारखे दानशूर असल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी स्टेजवर शिंदे गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) आणि फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले (Bharatshet Gogawale) होते.

दरम्यान, आमदार जानकर यांच्या वक्तव्यावर संकल्प डोळस यांनी जोरदार चिमटे काढले असून इतकी वर्ष आमदारकीसाठी धडपडला. पण तुम्हाला आमदार करायचे काम शरद पवार (Sharad Pawar) आणि विजय दादा (Vijaysinh Mohite Patil) यांनीच केले. यापूर्वी तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीपर्यंत चार पक्षाचे चारोधाम फिरून आलात. मात्र तुम्हाला प्रत्येक वेळा पराभूत व्हावे लागले. यंदा पहिल्यांदाच तुम्हाला मिळालेली आमदारकी ही शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील  यांच्या कृपेमुळे मिळाली आहे. असे असताना तुम्हाला एवढे मोठे नेते सोडून राज्याचे एक नेते हे कर्णा सारख दानशूर वाटू लागले आहेत. अशी बोचरी टीका संकल्प डोळस यांनी केली आहे.

सह्याद्रीसारख्या विजयदादा आणि हिमालयासारख्या शरद पवार यांनी तुम्हाला आमदार केलं

दरम्यान, यापूर्वी तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी फिरून आलात. ज्या मोहिते पाटलांना 40 वर्ष विरोध केल्याने तुम्हाला कधी विधानसभेला जाता आले नव्हते, त्याच सह्याद्रीसारख्या विजयदादा आणि हिमालयासारख्या शरद पवार यांनी तुम्हाला आमदार केले. मग या ज्येष्ठ नेते तुम्हाला कधी कर्ण दिसला नाही का? आत्ताच तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्यामधील दानशूरपणा कसा दिसला आणि याचे कारण काय? असा प्रश्न संकल्प तुळस यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना विचारला आहे.संकल्प डोळस हे माळशिरस येथील दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस यांचे सुपुत्र असून उत्तम जानकर यांच्या जातीच्या प्रमाणपत्राबाबत त्यांनीच मुंबई उच्च न्यायालयात जानकर यांना अडचणीत आणले आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरी बाणा सत्तेसाठी रडीचा डाव खेळणाऱ्यांना पायतान हाणा...! कोल्हापुरात गोकुळ मोर्चाला सुरुवात, महायुती सरकार विरोधात शेतकऱ्यांचा संताप
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरी बाणा सत्तेसाठी रडीचा डाव खेळणाऱ्यांना पायतान हाणा...! कोल्हापुरात गोकुळ मोर्चाला सुरुवात, महायुती सरकार विरोधात शेतकऱ्यांचा संताप
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
Sushma Andhare : देवेंद्र फडणवीस नागगोळी, उद्धव ठाकरे सुतळी बॉम्ब, तर एकनाथ शिंदे...; फटाक्यांची उपमा देत सुषमा अंधारेंकडून जोरदार राजकीय आतिषबाजी, कुणाबद्दल काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस नागगोळी, उद्धव ठाकरे सुतळी बॉम्ब, तर एकनाथ शिंदे...; फटाक्यांची उपमा देत सुषमा अंधारेंकडून जोरदार राजकीय आतिषबाजी, कुणाबद्दल काय म्हणाल्या?
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Mumbai Water Cut: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, हिवाळ्यातच तलावांमधील पाणीसाठ्यात घट, BMC चं राज्य सरकारला पत्र, नेमकं काय झालं?
Embed widget