एक्स्प्लोर

World Heritage Sites :40 पैकी पाच जागतिक वारसा स्थळं महाराष्ट्रात, अशी आहे यादी

महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांची यादी समजून घ्या या स्थळांची संपूर्ण माहिती.

Tourist places in Maharashtra : राज्याच्या दृष्टीने त्याची संस्कृती आणि नैसर्गिक विविधता ही त्याला एक वेगळी ओळख निर्माण करुन देत असते. ते पाहण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येत असतात. त्यातही राज्यातील ठिकाणं ही जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असतील तर त्याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. आपल्या देशात एकूण 40 ठिकाणांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच ठिकाणांचा समावेश आहे. UNESCO च्या संकेतस्थळावर ही यादी पहायला मिळते.

देशाचा विचार करता एकूण 40 ठिकाणाचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश आहे. त्यामध्ये सांस्कृतिक विभागात 32 तर नैसर्गिक विभागात सात ठिकाणांचा आणि एका ठिकाणाचा मिक्स प्रकारच्या यादीत समावेश आहे. 

महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळं

अजिंठा लेणी

प्राचीन चित्रकलेसाठी प्रसिद्ध असणारी अजिंठा लेणी महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात आहे.औरंगाबाद शहरापासून 100 किलोमीटरवर वाघूर नदीच्या परिसरात या लेण्या आहेत. UNESCO या संस्थेने 1983 साली जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला. बौद्ध धर्मातील हिनयान आणि महायान पंथियांचे लेणी साहित्य येथे आहे. ही लेणी पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून तसेच इतर ठिकाणावरून असंख्य पर्यटक येत असतात.

वेरूळची लेणी

इसवी सण 1951 रोजी भारत सरकारने वेरूळच्या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले तर UNESCO या संस्थेने 1983 साली जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला. पाचव्या ते दहाव्या शतकातील कोरलेल्या औरंगाबाद शहरापासून अगदी 30 किलोमीटरवर वेरूळची 34 लेण्या आहेत. बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मातील लेणी एकाच ठिकाणी पाहण्यास मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. ज्याला व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हिटी) किंवा सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून ओळखले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेक सुवर्णजयंतीच्या निमित्ताने इसवी सन 1887 मध्ये याची निर्मिती झाली. UNESCO या संस्थेने 2004 साली जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिला.

मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल

व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ बॉम्बे हा मुंबईच्या किल्ल्या परिसरात 19व्या शतकातील व्हिक्टोरियन रिव्हायव्हल सार्वजनिक आणि 20व्या शतकातील मुंबई आर्ट डेको खाजगी इमारतींचा संग्रह आहे. या जोडणीला 2018 मध्ये UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.

एलिफंटा केव्ह्ज

एलिफंटा लेणी  मुंबई शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर घारपुरी बेटावर आहेत. 1987  मध्ये, एलिफंटा लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. मनोरंजक आणि आश्चर्यकारक एलिफंटा लेणी मध्ययुगीन रॉक-कट कला आणि वास्तुकलाचा एक भव्य नमुना आहे.

नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांची यादी

  • काझिरंगा नॅशनल पार्क- आसाम 1985
  • केवलागदेव-घाना नॅशनल पार्क- राजस्थान 1985
  • मानस वाईल्डलाईफ सॅन्चुरी- आसाम, 1985
  • नंदा देवी नॅशनल पार्क, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स- उत्तराखंड, 1988,2005
  • सुंदरबन नॅशनल पार्क- पश्चिम बंगाल, 1987
  • पश्चिम घाट- महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ, 2012
  • ग्रेट हिमालयीन नॅशनल पार्क- हिमाचल प्रदेश, 2014

सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी

  • ताजमहल- उत्तर प्रदेश, 1983
  • वेरुळ लेण्या- महाराष्ट्र, 1983
  • अजंठा लेण्या- महाराष्ट्र 1983
  • आग्रा किल्ला- उत्तर प्रदेश, 1983
  • सूर्य मंदिर कोणार्क- ओडिशा- 1984
  • महाबलीपूरम- 1984
  • खजुराहो लेण्या- मध्य प्रदेश- 1986
  • फत्तेपूर सिक्री- उत्तर प्रदेश, 1986
  • गोव्यातील चर्चेस- गोवा, 1986
  • पट्टदकलमधील मंदिरे- कर्नाटक, 1987
  • चोल राजांची मंदिरे- तमिळनाडू, 1987
  • एलेफंटा केव्ह्ज- महाराष्ट्र, 1987
  • सांची स्तूप- मध्य प्रदेश, 1989
  • कुतुब मिनार- दिल्ली, 1993
  • हुमायूनची कबर- दिल्ली, 1993
  • भारतातील पर्वतीय रेल्वे- निलगिरी, तामिळनाडू, 1999
  • महाबोधी मंदिर- बोध गया, बिहार, 2002
  • भीमबेटका- मध्य प्रदेश, 2003
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मुंबई, महाराष्ट्र, 2004
  • चंपानेर-पावागढ उद्यान- गुजरात, 2004
  • लाल किल्ला- दिल्ली, 2007
  • राणी की बाव- गुजरात, 2014
  • नालंदा विश्वविद्यालय (महाविहार)- बिहार, 2016
  • जयपूर पिंक सिटी- राजस्थान, 2020
  • अहमदाबाद- गुजरात, 2017
  • व्हिक्टोरियन अॅन्ड आर्ट डेको एन्सेम्बल- मुंबई, 2018
  • चंदीगड शहर- चंदीगड, 2016
  • काकतिया मंदिर (रामप्पा) मंदिर- तेलंगना, 2021
  • ढोलविरा- गुजरात, 2021

मिश्र विभागातील स्थळ

  • कांचनगंगा नॅशनल पार्क- सिक्किम, 2016

इतर महत्वाच्या बातम्या

Health Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्हीही गरम पाणी आणि लिंबू पितात का? जाणून घ्या फायदे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget