Trending : रेल्वे स्टेशनवर भटक्या कुत्र्याला भरवला मायेचा घास, महिलेचा व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या प्राण्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळत असते. नुकताच पश्चिम बंगालमधील (West Bengal) एका रेल्वे स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेक नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला एका मोठ्या वाटीमध्ये दही आणि भात घेऊन रेल्वे स्टेशनवर बसली आहे. तिच्या समोर एक पांढऱ्या रंगाचा एक कुत्रा बसलेला आहे. या कुत्र्याला ती महिला स्वत:च्या हातानानं तो दही भात खाऊ घालत आहे. डॉगएक्सप्रेस या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट्स देखील केल्या आहेत. व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'धन्यवाद मॅम, तुमच्याबद्दल प्रचंड आदर वाटत आहे.'
View this post on Instagram
व्हिडीओला कमेंट करून अनेकांनी त्या महिलेचं कौतुक केलं आहे. काही नेटकऱ्यांनी वेगवेगळे स्टिकर्स शेअर करून या माहिलेचं कौतुक केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :