(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे आईस्क्रीम खाल्ले असतील; पण मिरची आईस्क्रीमचा हा प्रकार चाखलाय का? पाहा व्हिडीओ
Viral Video : सोशल मीडियावर एक स्ट्रीट फूड विक्रेता विचित्र पद्धतीने हिरव्या मिरचीचे आईस्क्रीम बनवताना दिसत आहे.
Viral Video : आजकाल देशभरातील स्ट्रीट फूड विक्रेते असे अजब पदार्थ बनवताना दिसत आहेत, जे पाहून सोशल मीडियावर यूजर्स संतापले आहेत. अनेकदा फूड ब्लॉगर्स असे विचित्र पदार्थ सर्वांसमोर आणताना दिसतात. साधारणपणे असे दिसून येते की, स्ट्रीट फूड विक्रेते दोन वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ एकत्र करून वेगळीच डिश बनवतात. अनेकदा ह्या पदार्थांना weird food म्हटले जाते.
उन्हाळ्यात बाजारात आईस्क्रीमची मागणी खूप वाढलेली असते. अशा वेळी आईस्क्रीम प्रेमींसाठी आईस्क्रीम हा फार जिव्हाळ्याचा विषय ठरतो. प्रत्येकाला आपल्या आवडत्या आईस्क्रीमचे फ्लेवर्स चाखायला आवडतात. उन्हाळ्यात तर आईस्क्रीम दिलासादायक ठरते. अशा परिस्थितीत जर तुमची उष्णता वाढविणारे आईस्क्रीम तुम्ही खाल्ले तर तुम्हाला कसं वाटेल? आईस्क्रीम ही मुळात थंडावा मिळावा म्हणून खाल्ली जाते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे ते तुम्हीच पाहा.
View this post on Instagram
खरंतर, सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये, एक स्ट्रीट फूड विक्रेता आईस्क्रीमबरोबर प्रयोग करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हा विक्रेता हिरव्या मिरचीचे आईस्क्रीम बनवत आहे. हा विक्रेता प्रथम ट्रेच्या वर चार मिरच्या ठेवते आणि त्यावर चॉकलेट सिरप घालते. मग तो पुन्हा चॉकलेट सिरप आणि क्रीम घालून मिरची बारीक कापून त्याची पातळ पेस्ट बनवतो. यानंतर, थंड झाल्यावर, रोलमध्ये कापून मिरचीसह सर्व्ह करताना दिसचो. या व्हिडिओमध्ये काही महिला या चिली आईस्क्रीम चाखताना दिसत आहेत, ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Viral : पॅंगाँग तलावात घुसवली कार, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, कारवाईची मागणी
- Viral Video : अबब! चक्क सहा हजार फूट उंचीवर पठ्ठ्यानं केलं रोपवॉक; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं नाव
- Viral Video : धक्कादायक! इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाचे दोन तुकडे, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha