(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ना कॉलेजला गेला, ना निकाल आला... तरी बरेच वर्ष पालकांना फसवत राहिला मुलगा
America: एका मुलाने अनेक वर्ष त्याच्या पालकांना वेडं बनवलं आहे. हा मुलगा ना कॉलेजला गेला, ना कधी त्याचा निकाल लागला, तरी त्याने घरच्यांना वाईट पद्धतीने फसवलं. नेहमी खोटे निकाल घरी दाखवत राहिला.
America: तुम्ही अशा अनेक घटनांबद्दल ऐकलं असेल, ज्यात मुलं त्यांच्या आईवडिलांशी (Parents) काहीतरी खोटं बोलले असतील. पण एका मुलाने खोटं बोलण्याचा कहरच केला, त्याने आईवडिलांना मी कॉलेजला जात असल्याचं सांगून अनेक वर्षं मुर्ख बनवलं. या मुलाला कॉलेजच्या पहिल्याच वर्षांत कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं. पण ही गोष्ट घरी सांगायची कशी? या विचाराने तो घरच्यांशी खोटं बोलत आला.
पालकांना आजही माहीत नाही सत्य
अनेक वर्ष या मुलाने आईवडिलांना खोटे निकाल आणून दाखवले, हा प्रकार अमेरिकेत घडला आहे. वॉल्टर नावाचा या व्यक्तीचं आता लग्न झालं आहे आणि त्याला मुलं देखील आहेत. इतक्या वर्ष मुलाने आपल्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली, हे त्याच्या आईवडिलांना आजही माहीत नाही.
मित्रांच्या निकालावर टाकलं स्वत:चं नाव
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, वॉल्टरच्या मित्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. हा प्रकार अनेक वर्षांपूर्वी घडल्याचा दावा वॉल्टरच्या मित्राने केला. वॉल्टरचा हा प्रसंग सांगताना त्याचा मित्र म्हणतो, 'माझ्या मित्राने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ग्रॅज्युएट झाल्याचं नाटक केलं. ही गोष्ट बऱ्याच वर्षांपुर्वीची आहे. मी बिग वेस्ट कोस्ट स्कूलमध्ये गेलो आणि तिथून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि माझ्या मित्राची कॉलेजच्या पहिल्या सेमिस्टरनंतर लगेच हकालपट्टी करण्यात आली होती. आता हा प्रकार तो त्याच्या आई-वडिलांना सांगू शकला नाही. म्हणूनच तो आम्हा मित्रांचे निकाल (Result) घेऊन त्यावर त्याचं नाव आणि त्यासमोर A ग्रेड, B ग्रेड असं कॉपी पेस्ट करायचा आणि त्याच्या घरी पालकांना दाखवायचा.
क्लाससाठी पाठवलेले पैसे उडवले
मित्राने पुढे सांगितलं की, वॉल्टरचे आईवडील त्याला खासगी क्लास लावण्यासाठी देखील पैसे पाठवायचे. पण तो 4 वर्ष घरच्यांशी खोटं बोलत राहिला. तो वेगवेगळ्या मित्रांचे निकाल किंवा रिपोर्ट कार्ड घ्यायचा आणि त्यावर स्वत:चं नाव टाकून A ग्रेड, B ग्रेड टाकायचा. ग्रॅज्युएशन सेरिमनिला देखील त्याने कॅप आणि गाऊन विकत घेतला आणि त्यासोबत फोटो घेतला. दुसऱ्या विद्यार्थ्याची डिग्री घेऊन त्याने घरी दाखवली.
पण आज खऱ्या आयुष्यात यशस्वी
या सर्व प्रकारानंतर वॉल्टर घरी गेला आणि सामान्य जीवन जगी लागला. आज तो यशस्वी व्यक्ती आहे. त्याच्याकडे मुलं, चांगला परिवार आणि करोडोची मालमत्ता आहे. वॉल्टरच्या मित्राने त्याची ही गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर लोक त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा:
Trending: BF च्या फोनमध्ये दिसलं असं काही; प्रेयसीला बसला धक्का, म्हणाली- 5 वर्षांचं नातं क्षणात....
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI