VIDEO: ढसाढसा पाजली सापाला दारू; मद्यपी टोळक्याचा पराक्रम, व्हिडीओ व्हायरल
Viral Video: एका मद्यपी टोळक्याने चक्क सापाला पकडून जबरदस्तीने दारू पाजली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या मुलांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Viral Video: एखाद्या पार्टीत वैगेरे मित्राने मित्राला किंवा मैत्रिणीला जबरदस्तीने दारू (Alcohol) पाजल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण दक्षिण आफ्रिकेतील मुलांनी माणसांना दारू न पाजता चक्क सापालाच (Snake) पकडून दारू पाजली आहे. इतकंच नाही तर या घटनेचा व्हिडिओही त्यांनी बनवला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, यात मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने सापाला पकडून दारू पाजल्याचं दिसत आहे.
जबरदस्तीने पाजली सापाला दारू
अजगर जातीचा साप तसा विषारी नसतो, पण त्याने एखाद्याला पकडलं तर अनेकदा मरेपर्यंतही सोडत नाही. अशा या अजगराला पकडण्याचं धाडस या मद्यपींच्या टोळक्याने केलं, नंतर त्याचं तोंड उघडलं आणि त्याला जबरदस्तीने बाटलीतील दारू पाजण्यास सुरुवात केली.
तरुणांविरोधात गुन्हा दाखल
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली, यानंतर आता पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत. सापाशी केलेल्या क्रूरतेची दखल घेत या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मद्यधुंद तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलीस सक्रिय झाले आहेत. ज्या सापाला त्यांनी ही क्रूर वागणूक दिली, तो संरक्षित आहे. अशा परिस्थितीत सापासोबत घडलेली ही घटना लक्षात घेऊन पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास घेत आहेत.
These drunken yobs are being hunted in South Africa for animal cruelty after force-feeding Carling Black Label lager down the throat of a terrified python. pic.twitter.com/1fFBmiRIRd
— WORLD X MONITOR (@worldXmonitor) October 20, 2023
दारू सापांसाठी ठरू शकते घातक
सापांसाठी दारू ही घातक असल्याचं सर्पतज्ज्ञांनी म्हटलं आहे. सापाची पचनक्रिया अशी असते की ते दारू पचवू शकत नाहीत, असंही सर्पतज्ज्ञांनी म्हटलं. दारूमुळे सापाच्या अंतर्गत पेशी जळाल्या असाव्यात, असं सर्पतज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे सापाच्या पेशींचं नुकसान तर झालं असेलच, पण त्याचा मृत्यूही झाला असता. मायकेल ग्रोव्हर नावाच्या तज्ज्ञांनी सांगितलं की, थोडी दारू देखील सापांसाठी घातक ठरू शकते, कारण दारुमुळे त्यांच्या क्षमतेवर परिणाम होतो. फक्त सापच नाही तर इतर प्राण्यांतही दारू पचवण्याची क्षमता नाही. दारू पाजल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा:
Trending: दारू ढोसायचा, पोटभर खायचा; बिल देताना मात्र आजारपणाचं नाटक, मग एकदाच पोलखोल झाली अन्...