Viral Video : हाय गरमी... स्कूटीच्या सीटवर तयार केला डोसा; व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओमध्ये हा व्यक्ती स्कूटीच्या सीटवर डोसा तयार करताना दिसत आहे.

Viral Video : अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हामुळे अनेक लोक घराच्या बाहेर देखील जात नाहीत. पण एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media)प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा व्यक्ती स्कूटीच्या सीटवर डोसा तयार करताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कडक उन्हामध्ये स्वत:च्या स्कूटीच्या सीटवर एक व्यक्ती डोसा तयार करतो. हा व्हिडीओ streetfoodofbhagyanagar या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'हे घरी ट्राय करुन नका.' '40 डिग्री तापमानात प्रोफेशनल व्यक्तीनं तयार केलेला वेस्पा डोसा. ' असं या व्हिडीओवर लिहिलेलं आहे. आत्तापर्यंत 1.2 मिलीयन नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला लाइक केले आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
या व्हायरल व्हिडीओला पाहून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट् केल्या आहेत. एका युझरनं कमेंट केली, 'एक प्लेट होंडा अॅक्टिव्हा डोसा.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, 'बघा किती उन्हाळा आहे. ' सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळाली असून व्हिडीओमधील त्या व्यक्तीच्याल या भन्नाट कल्पनेचे अनेकांनी कौतुक केले आहे.
View this post on Instagram
एका महिलेनं गाडीच्या बोनटवर भाजल्या होत्या चपात्या
ओडिशामधील सोनपूर येथे देखील उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यावेळी येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक महिला ही गाडीच्या बोनटवर चपात्या भाजल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
