Tractor Jugad : शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, पूर परिस्थितीतून वाचण्यासाठी बनवला 10 फूट उंच ट्रॅक्टर
Trending : सध्या सोशल मीडियावर एका ट्रॅक्टरची तुफान चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे या ट्रॅक्टरची उंची 10 फूट आहे.
Unique Tractor Viral News : सध्या एक ट्रॅक्टर ( Tractor ) सोशल मीडियावर ( Social Media ) चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण आहे या ट्रॅक्टरची उंची. हा ट्रॅक्टर 10 फूट उंच आहे. या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे हा दलदल, कालवे, नदी आणि तलाव सहज पार करतो. हा ट्रॅक्टर मुझफ्फरनगरच्या एका शेतकऱ्याने देशी जुगाड करत बनवला आहे. सध्या हा अनोखा ट्रॅक्टर लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. सर्वदूर याची चर्चा पसरली आहे. सध्या सोशल मीडियावर हा ट्रॅक्टर खूप व्हायरल होत आहे.
शेतकऱ्याने बनवला 10 फूट उंच ट्रॅक्टर
हा अनोखा ट्रॅक्टर उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh ) मुझ्झफरनगर ( Muzaffarnagar ) येथील आहे. मुझ्झफरनगर शहरातील भोपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुक्र तीर्थ येथे राहणारे जसवंत सिंह यांचा हा ट्रॅक्टर आहे. जसवंत यांनी 2002 मध्ये जॉन डीअर कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला होता. पण पावसाळ्यात शुक्र तीर्थक्षेत्रात वारंवार पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे पिकांची नासाडी होते. याशिवाय पूरग्रस्त ग्रामीण भागाचा मुख्य रस्त्यांशी संपर्कही तुटतो.
शेतकरी जसवंत यांची अनोखी शक्कल
त्यामुळे जसवंत यांनी शक्कल लढवत देशी जुगाड केला आणि ट्रॅक्टरची उंची वाढवली. त्यांनी जॉन डीअर कंपनीच्या ट्रॅक्टरचा कायापालट केला. त्यांचा हा ट्रॅक्टर 10 फूट उंच आहे. या उंचीमुळे ट्रॅक्टर एखादा कालवा आणि तलाव सहज पार करतो. तसेच हा ट्रॅक्टर दलदलीच्या क्षेत्रातूनही सहज बाहेर पडतो.
काय आहे ट्रॅक्टरची खासियत?
या शेतकऱ्याने जॉन डीअर कंपनीच्या या ट्रॅक्टरची उंची देशी जुगाड करत 5 फूटवरून 10 फूट केली आहे. त्यामुळे हा ट्रॅक्टर ऊस कापणी करण्यात मदत करतो. याच्या उंचीमुळे हा ट्रॅक्टर दलदलीतून सहज मार्ग काढत बाहेर पडतो.
जॉन डीअर कंपनीच्या ट्रॅक्टरचा कायापालट
जॉन डीअर कंपनीचा हा खास ट्रॅक्टर अतिशय शक्तिशाली ट्रॅक्टरच्या श्रेणीत येतो. हा ट्रॅक्टर प्रामुख्याने शेतीच्या कामांसाठी बनवण्यात आला आहे. पण मुझफ्फरनगरचे शेतकरी जसवंत सिंह यांनी आपल्या जुगाडाने या ट्रॅक्टरला अनोखं रुप दिलं आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या ट्रॅक्टरवर खिळून बसतात.
सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर या 10 फूट उंच ट्रॅक्टरचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. या ट्रॅक्टरची उंची पाहून नेटकरी चकीत झाले असून शेतकऱ्याचं खूप कौतुक करताना दिसत आहेत.