Viral : लडाखमधील पँगाँग तलावावर टॅटूग्राफरचं न्यूड फोटोशूट, फोटो व्हायरल
Pangong Lake Viral Photoshoot : पँगाँग तलावावरील टॅटूग्राफरचं न्यूड फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
Tattoographer Pangong Lake Photoshoot : लडाखला (Ladakh) जाणं हे अनेकांचे स्वप्न आहे. कारणे तेथील निसर्गाचं वर्णन करां तितकं कमी आहे. लडाखमधील पँगाँग तलाव (Pangong Lake) त्याच्या विहंगम दृश्यामुळे अतिशय प्रसिद्ध आहे. याच पँगाँग तलावावरील एका टॅटूग्राफरचं न्यूड फोटोशूट सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. या व्हायरल होत असलेल्या टॅटूग्राफरचं नाव करण असं आहे. दिल्लीच्या करणने पँगाँग तलावावर न्यूड फोटोशूट करत हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
टॅटूग्राफर करण याने विवस्त्र होतं पँगाँग तलावावर फोटोशूट केलं आहे. त्याचं हे फोटोशूट सध्या वेगानं व्हायरल होत आहे. करण हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तो त्याच्या टॅटूमुळे कायम चर्चेत असतो. त्याच्या संपूर्ण शरीरावर टॅटू आहेत. करण जगातील पहिला फुल मॉडिफाइड बॉडीबिल्डर आहे, कारण त्या संपूर्ण शरीरावर टॅटू आहेत. इतकंच नाही तर त्याने डोळ्यातही टॅटू काढले आहेत. टॅटूग्राफर करणच्या नावावर विक्रम असून त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे.
पँगाँग तलावावार फोटोशूट करण्याचं कारण काय?
पँगाँग तलाव हे अतिशय प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचं शूटींग झालं आहे. आमिर खानच्या 3 इडियट्य चित्रपटामध्ये शेवटचा सीन याचं तलावावर शूट करण्यात आला आहे. पँगाँग तलाव चीन सोबतच्या सीमाप्रश्नामुळे कायम चर्चेत असतो. पँगाँग तलावाने भारत ते चीन असा 134 किलोमीटरचा भाग व्यपला आहे.
View this post on Instagram
न्यूड फोटोशूट करण्यामागचं कारण
करण यानं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या फोटशूट मागचं कारण सांगितलं आहे. आपण निसर्गप्रेमी असल्यानं न्यूड फोटोशूट केल्याचं त्याने सांगितलं आहे. करणनं म्हटलं आहे की, 'पँगाँग तलाव अतिशय शांत आणि सुंदर परिसर आहे. इथे विवस्त्र होऊन बसल्यावर वेगळाच अनुभव मिळतो.'
करणला एकटं फिरण्याची आवड
करण लडाखमध्ये सोलो ट्रिपवर गेला आहे. त्याला एकटं फिरण्याची आवड आहे. तो ट्रिपसाठी जाताना फक्त त्याची बाईक आणि कॅमेरा सोबत घेऊन जातो. त्याचे वडील फोटोग्राफर असल्यानं करणलाही फोटोग्राफीची आवड आहे. एकटं फिरल्याने स्वत: सोबत अधिक वेळ घालवता येतो, असं त्याचं म्हणणं आहे. हे फोटोशूट करतानाही करणसोबत पँगाँग तलावावर दुसरं कोणीही नव्हतं. हे फोटोशूट त्यानं ट्रायपॉडच्या साहाय्यानं केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral : पँगाँग तलावात घुसवली कार, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, कारवाईची मागणी
- Pangong Lake Bridge : लडाखच्या पॅंगाँग तलावावर चीनकडून दुसऱ्या पुलाचं बांधकाम सुरू, भारताकडून सज्जड दम
- India China : भारत-चीन तणाव पुन्हा वाढणार? पॅंगाँग तलावावर चीनकडून दुसऱ्या पुलाचं बांधकाम सुरू