एक्स्प्लोर

IAF Father-Daughter Duo : बापलेकीनं एकत्र उडवलं लढाऊ विमान, भारतीय हवाई दलाच्या इतिहासात नवं सोनेरी पान

IAF Father-Daughter Duo : एअर कमोडोर संजय शर्मा (Sanjay Sharma) यांनी त्यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा (Ananya Sharma) हिच्यासोबत फायटर जेट उडवलं आहे. असं करणारी ही पहिली बापलेकीची जोडी आहे.

Indian Air Force Father-Daughter Duo : भारतीय वायू सेनेच्या सुवर्ण आणि गौरवशाली इतिहासामध्ये आज आणखी एका कामगिरीची नोंद झाली आहे. भारतीय वायू सेनेच्या इतिहासामध्ये आज आणखी एक पानं जोडलं गेलं आहे. भारतीय वायूसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा बापलेकीच्या जोडीनं एकत्र फायटर जेट (Fighter Jet) उडवलं आहे. एअर कमोडोर संजय शर्मा (Sanjay Sharma) यांनी त्यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा (Ananya Sharma) हिच्यासोबत फायटर जेट उडवलं आहे. लढाऊ विमान उडवणारी ही पहिली बापलेकीची जोडी आहे. या दोघांनी एकाच इन-फार्मेशनमधून (In-Formation) उड्डाण केलं.

एअर कमोडोर संजय शर्मा (Sanjay Sharma) यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा (Ananya Sharma) प्रशिक्षणार्थी आहे.  संजय शर्मा आणि अनन्या शर्मा या दोघांनी भारतीय हवाई दलाच्या बीदर स्टेशनवर हॉक-132 (Hawk-132) एकाच इन-फार्मेशनमधून (In-Formation) लढाऊ विमानातून उड्डाण केलं. अनन्या फायटर पायलट अभ्यासक्रमात पदवी पूर्ण करण्याआधीचं प्रशिक्षण घेत आहे. भारतीय हवाई दलाच्या इतिहासामध्ये याआधी कधीही वडील आणि मुलीने एकत्र फायटर जेट उडवलं नव्हतं.

मुलगी अनन्या शर्मावर वडिलांना अभिमान
संजय शर्मा (Sanjay Sharma) यांनी मुलगी अनन्या शर्मावर (Ananya Sharma) आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, अनन्याची त्यांच्या प्रमाणे फायटर पायलट बनण्याची इच्छा आहे. ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याने यावर आपल्याला अभिमान आहे. भारतीय हवाई दलाने माहिती दिली आहे की, 30 मे रोजी एअर कमोडोर संजय शर्मा (Sanjay Sharma) यांनी त्यांची मुलगी फ्लाईंग ऑफिसर अनन्या शर्मा (Ananya Sharma) यांनी एकाच फॉर्मेशनमध्ये उड्डाण करत नवीन इतिहास रचला.

भारतीय हवाई दलामध्ये 2016 पासून महिलांना फायटर पायलट बनण्याची संधी देण्यात आली. आता अनेक महिला सुपरसॉनिक जेटडी उडवतात.

अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget