![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Viral : बसमध्ये सीटवरून दोन आजोबांमध्ये 'वॉर', 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक मजेदार व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन आजोबा चक्क बसमधील सीटसाठी भांडताना दिसत आहेत.
![Viral : बसमध्ये सीटवरून दोन आजोबांमध्ये 'वॉर', 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल Viral video two person fighting for bus seat video viral on social media marathi news Viral : बसमध्ये सीटवरून दोन आजोबांमध्ये 'वॉर', 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/06/479a7edb08e4eccc107f12057f63d0e51657072664_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral Video : तुम्ही रेल्वे किंवा बसमधून प्रवास करताना अनेक वेळा लोकांना सीटसाठी भांडताना पाहिलं असेल. कधी कधी सीटसाठीचं हे भांडण बाचाबाचीवरून सुरु होऊन हाणामारीपर्यंतही पोहोचतं. तुमचंही कधीतही कोणाबरोबर सीटमुळं भांडणंही झालं असेल. ही एक सामन्य गोष्ट आहे. हे चित्र बस किंवा ट्रेनमध्ये नेहमी पाहायला मिळतं. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन आजोबांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध व्यक्तींमध्ये बसमधील सीटवरून भांडण सुरु असल्याचं दिसत आहे. एका प्रवाशानं या भांडणाचा व्हिडीओ काढला. त्यानंतर या दोन आजोबांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही आजोबा बसमधील सीटवरून भांडत आहेत. बसच्या सीटवरील जागेवरून या दोघांमध्ये बाचाबाची सुरु आहे. त्या दोघांमध्ये सुरु असेलल्या या भांडणाचा व्हिडीओ मात्र मजेदार आहे.
Me to my stomach after eating the 9th piece of Gulaabjamun pic.twitter.com/0Sutq1gEsX
— Sagar (@sagarcasm) July 3, 2022
दोघांमध्ये जागेवरून 'वॉर'
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन वृद्ध व्यक्ती एका बसच्या सीटवर बसले आहेत. या दोघांमध्ये जागेवरून खडाजंगी सुरु आहे. एक जण म्हणतं आहे की, सीटवर खूप जागा आहे. तर याला उत्तर देत दुसरा व्यक्ती म्हणतोय की, जागा नाहीय. यामध्ये विशेष म्हणजे हे भांडणारे दोघेही व्यक्ती वृद्ध असून त्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे मात्र तरीही या दोघांमध्ये भांडण सुरु आहे.
व्हायरल झाला भांडणाचा व्हिडीओ
या भांडणाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून कोणालाही हसू येईल. हा व्हिडीओ ट्विटरवर @sagarcasm या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर युजर्सच्या जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)