Trending News : समुद्राच्या लाटांसोबत सेल्फी काढणं पडलं महागात, पुढच्याच क्षणी सगळं दृश्यच पालटलं...
Trending News : नुकताच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक लोक समुद्राच्या लाटेत वाहून जाताना दिसत आहेत.
Trending News : सोशल मीडियावर दररोज अनेक आश्चर्यकारक आणि मनोरंजक व्हिडिओ दिसत असतात, जे युझर्सना हसवतात आणि सावधही करतात. अलीकडेच, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून अनेक लोकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत, तसेच नागरिक आता सतर्कही झाले आहेत. व्हिडीओमध्ये समुद्राच्या वाढत्या लाटांसोबत सेल्फी काढणं किती महागात पडलं हे दृश्य आहे.
समुद्राच्या लाटांसोबत सेल्फी काढणं पडलं महागात
जगभरातील लोकांना समुद्रकिनारी उभे राहून सेल्फी घेण्याचे तसेच समुद्र पाहण्याचा छंद आहे. अशा लोकांना काही वेळेस असे सेल्फी खूप वेदनादायक आणि भयानक ठरत असून ते जीवावर बेतत आहेत. अलीकडेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये समुद्रकिनाऱ्यावर उभे असलेले लोक समुद्राच्या वाढत्या लाटांसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
जोरदार वाऱ्यामुळे जोरदार लाटा
समुद्र किनाऱ्यावर अचानक वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे जोरदार लाटा उसळू लागल्याचे दिसून येते. जे अनेक मीटर पर्यंत वाढते. त्यामुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात पाणीरस्त्यावर येते. त्यामुळे त्यातून निर्माण झालेली शक्ती लोकांना काही अंतरापर्यंत दूर नेते. यामुळे अनेक लोकं जखमी देखील झाले आहेत.
सतर्क राहण्याचा संदेश
सध्या हा व्हिडिओ युजर्सना किनारी भागात फिरताना सतर्क राहण्याचा संदेश देत आहे. त्याच वेळी, हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, जे आतापर्यंत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले आहे. तसेच या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच वेळी, आश्चर्यचकित झालेले युझर्स त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत, तसेच आपले अनुभवही शेअर करत आहेत.