Friend Zone : 'तू फक्त चांगला मित्र...' म्हणत फ्रेंड झोन करणं तरुणीला महागात, तरुणाने दाखल केला 24 कोटींचा खटला
Man Sues Woman for Friend Zoning : 'तू फक्त चांगला मित्र...' म्हणत फ्रेंड झोन करणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तरुणीवर चक्क 3 मिलियन डॉलरचा खटला दाखल केला आहे.
Man Sues Woman for Friend Zoning : एखाद्या मुलाने किंवा मुलीने लव्ह प्रपोझल (Love Proposal) नाकारणे अगदी सामान्य गोष्ट आहे. या प्रकारणांमध्ये फ्रेंड झोन (Friend Zone) हा शब्द येतो. यामध्ये फक्त चांगला मित्र किंवा मैत्रिण म्हणत प्रेमाला नकार दिला जातो. याबाबत एक विचित्र घटना समोर आली आहे. 'तू फक्त चांगला मित्र...' म्हणत फ्रेंड झोन करणं तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. यामुळे एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तरुणीवर चक्क 3 मिलियन डॉलरचा खटला दाखल केला आहे. 3 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 24 कोटी भारतीय रुपये. सिंगापूरमध्ये ही विचित्र घटना समोर आली आहे.
फ्रेंड झोन करणं तरुणीला महागात
अमेरिकन टीव्ही शो फ्रेंड्स (F.R.I.E.N.D.S) मुळे फ्रेंड झोन हा शब्द अधिक प्रचलित झाला. फ्रेंड झोन करणे म्हणजे फक्त चांगला मित्र किंवा मैत्रिण, त्यांच्यामध्ये प्रेमाची भावना नाही. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्येही या शब्दाचा वापर केला असेल. कधी मित्रांना चिडवलं देखील असेल. पण याच फ्रेंड झोन शब्दावरून एका तरुणाने त्याच्या मैत्रिणीला कोर्टात खेचलं आहे. तरुणाने आपल्याला मानसिक आणि भावनिक धक्का बसल्याचं सांगत तरुणीविरोधात 24 कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या व्यक्तीने सांगितलं की त्या तरुणीने फ्रेंड झोन केल्यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याची मानसिक शांती बिघडली. तसेच यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला सुद्धा हानी पोहोचली आहे. 2020 पासून या दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी तरुणाला समजले की, तरुणी त्याला फक्त आपला चांगला मित्र मानते. त्यानंतर तरुणीने त्याच्यासोबत बोलणं आणि संपर्क कमी केला. यामुळे त्यांच्यात दुरावा आला.
एकतर्फी प्रेमामुळे वाद
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, नोरा टॅन शू मेई आणि के कावशिंगन यांची 2016 मध्ये भेट झाली आणि त्यांची मैत्री झाली. त्यानंतर 2020 मध्ये दोघांमध्ये काही गोष्टीवरून मतभेद झाले आणि नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला.
तरुणीची प्रतिक्रिया काय होती?
नोराने सांगितलं की, ते फक्त चांगले मित्र होते पण कावशिंगन तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. एक दिवस त्याने नोराला भेटायला बोलावलं आणि प्रपोज केलं. तिने गर्लफ्रेंड होण्यास नकार दिला. सुरुवातीला नोराने त्याला समजावलं. पण नंतर त्याच्यासोबत बोलणं कमी केली. यानंतर आपण डिप्रेशनमध्ये गेलो असं कावशिंगननं सांगितलंय.
मानसिक आघात झाल्यामुळे आर्थिक नुकसान
तीन दशलक्ष डॉलर्सशिवाय, कावाशिगनने मॅजिस्ट्रेट कोर्टात 22 हजार डॉलर्सचा खटलाही दाखल केला आहे. कावाशिंगनचा आरोप आहे की, नोराने त्याच्यासोबत संपर्क तोडल्यामुळे आणि दुर्लक्ष केल्यामुळे त्याची काम करण्याची इच्छा नष्ट झाली. त्यामुळे कावशिंगनला पाच व्यावसायिक भागीदारी गमवाव्या लागल्या आहेत. कावाशिगनच्या म्हणण्यानुसार, खूप नुकसान झाल्यानंतर त्यांना आघातातून बाहेर येण्यासाठी त्याला खूप खर्च करावा लागला, असंही त्याने सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :