Russia Ukraine War : सांताक्लॉजच्या रुपात आला युक्रेनचा फायटर पायलट; अन् थेट मिसाईलचा मारा, Video होतोय व्हायरल
Santa Claus Fighter Pilot : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सांताक्लॉजच्या वेशभूषेत असलेल्या युक्रेनच्या सैनिकाने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे दिसत आहे.
Ukrainian Fighter Pilot in Santa Claus Dress Video : युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) देशांमधील संघर्ष अद्यापही कायम आहे. या दोन्ही देशामधील युद्धाला सुमारे 10 महिने उलटून गेले आहेत. सुमारे 300 दिवसांहून अधिक दिवस हा सुरु असलेला संघर्ष अद्यापही संपण्याचे नाव घेत नाहीय. रशियाने नव्या वर्षांतही रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. नवीन वर्षाच्या अखेरीस ख्रिसमसच्या वेळी रशियाने युक्रेनवर अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केला. ख्रिसमसच्या वेळी संपूर्ण जग उत्साह आणि जल्लोषात असताना रशियाने युक्रेनवर सुमारे 100 हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा करत युक्रेनवर मोठा हल्ला केला.
सांताक्लॉजच्या वेशभूषेत आला फायटर पायलट
युक्रेनचे सैन्य अत्यंत कठीण परिस्थितीतही रशियासमोर हार मानायला तयार नाही. युक्रेनियन सैन्य पूर्ण ताकदीने रशियाशी दोन हाच करत आहे. रशियाला चोख प्रत्युत्तर देण्यात युक्रेन कोणतीही कसर सोडलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सांताक्लॉजच्या वेशभूषेत असलेल्या युक्रेनच्या सैनिकाने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ युक्रेनच्या लष्कराने आपल्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, युक्रेनच्या या फायटर पायलटने MIG-29 ने हल्ला केला. या फायटर पायलटने AGM-88 HARM या अमेरिकन मिसाईलने रशियावर हल्ला केला आहे. यावेळी या लढाऊ विमानाचा वैमानिक चक्क सांताक्लॉजच्या वेशभूषेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
View this post on Instagram
लाखो लोकांनी पाहिला व्हिडीओ
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, या सांताक्लॉजसमोर कोणीही टिकू शकत नाही. अनेक नेटकरी युद्ध लवकर संपावे अशी, आशा व्यक्त करत आहेत. नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही रशियाने युक्रेनवर ड्रोनने हल्ला करण्यास सुरुवात केली असून रशियन सैनिकांनी कीव्ह शहराला लक्ष्य केले आहे.
रशियाकडून एका दिवसात 120 क्षेपणास्त्रांचा मारा
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाताळच्या संध्येला रशियाने युक्रेनवर 120 क्षेपणास्त्रे डागली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने कीव्हसह युक्रेनमधील सात शहरांवर समुद्र आणि आकाशातून क्षेपणास्त्र हल्ला केला. रशिया आणि युक्रेन युद्धा आतापर्यंत दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण हे युद्ध अजूनही संपलेलं नाही.