Ram Mandir Saryu Cow : रामभक्त गायीची 22 वर्षांची तपश्चर्या, दररोज रामलल्लाला प्रदक्षिणा अन् एकादशीचे व्रत
Ayodha Ram Mandir : एक गाय गेल्या 22 वर्षांपासून रामल्लाची प्रदक्षिणा घालत आहे. शरयू गोमातेची तपश्चर्या आता पूर्ण होणार आहे.
Ayodhya Ram Mandir Saryu Cow : सध्या संपूर्ण देश रामनामाच्या गजरात न्हाऊन निघालाय, असं म्हणावं लागेल. 22 जानेवारीला अयोध्येत (Ayodhya) राम मंदिरात (Ram Temple) रामलल्लाची (Ram Lalla) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) होणार आहे. अयोध्येत रामलल्लाचा अभिषेक (Ram Lala Abhishek) आणि प्राणप्रतिष्ठा कधी होणार याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. अयोध्येत बांधलेल्या नवीन राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. भगवान राम या पृथ्वीच्या प्रत्येक कणात विराजमान आहेत. रामभक्तांनी वर्षानुवर्षे पाहिलेले राम मंदिराचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे देशात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. प्रभू श्रीराम यांच्या भक्तीची झलक फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही दिसते. श्रीरामाच्या अशाच एका परम भक्ताबाबत आम्ही माहिती सांगणार आहोत. गेली 22 वर्षे हा रामभक्त तपश्चर्या करत असून दररोज रामलल्लाची प्रदक्षिणा करतो.
रामभक्त गोमाता शरयू
प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येपासून सुमारे 220 किलोमीटर अंतरावर गोरखपूर जिल्ह्यातील भवानपूर गावात रंगमहाल मंदिराजवळ एक गोठा आहे. सुमारे 22 वर्षांपूर्वी येथे एका गायीचा जन्म झाला होता. ही गाय (Cow) प्रभू राम जन्मस्थानाजवळील मंदिरात आली आणि श्रीरामाच्या भक्तीत लीन झाली. गेल्या 22 वर्षांपासून ही गाय येथे तपश्चर्या करत आहे. ही गोमाता दररोज रामलल्लाला प्रदक्षिणा घालत प्रार्थना करते. या रामभक्त गोमातेचं नाव शरयू असं आहे.
गोमातेला भूमिपूजनाचंही निमंत्रण
रामलल्लाच्या अंगणात दिवसातून 108 वेळा प्रदक्षिणा घालते आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होणे, हा गेल्या 20 वर्षांपासून रामभक्त शरयू गाईचा हाच नित्यक्रम आहे. ही गोमाता गेल्या 20 वर्षांपासून रामलल्लाला दररोज प्रदक्षिणा घालत आहे. या गोमातेला राम मंदिराच्या भूमिपूजनाचंही निमंत्रण देण्यात आलं होतं.
अयोध्या में निर्माणाधीन श्रीराम जन्मभूमि मंदिर की विशेषताएं:
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 4, 2024
1. मंदिर परम्परागत नागर शैली में बनाया जा रहा है।
2. मंदिर की लंबाई (पूर्व से पश्चिम) 380 फीट, चौड़ाई 250 फीट तथा ऊंचाई 161 फीट रहेगी।
3. मंदिर तीन मंजिला रहेगा। प्रत्येक मंजिल की ऊंचाई 20 फीट रहेगी। मंदिर में कुल… pic.twitter.com/BdKNdATqF6
अयोध्येच्या 'शरयू'ची तपश्चर्या पूर्ण
इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार, ही राम फक्त शरयू गाय गेल्या 22 वर्षांपासून तपश्चर्या करत आहे. एवढंच नाही तर, श्यामा एकादशीच्या दिवशी शरयू गाय व्रत करते. गोमाता शरयूचा जन्म एकादशीच्या दिवशी झाला होता. शरयू गाय अयोध्येच्या रंगमहालात राहते. गोमाता दररोज न चुकता रामलल्लाला प्रदक्षिणा घालेत. एवढंच नाही तर रामलल्लाची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर ती नतमस्तक ठेवून उभी राहते, जणू ती प्रभू रामाला नमस्कार करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :