Viral Video : समुद्र किनारी मस्ती करणं तरुणीच्या अंगलट, अचानक लाट आली अन्...; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
Trending Video : समुद्र किनारी मस्ती करणं एका तरुणीला चांगलंच भोवलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नक्की काय घडलं हे तुम्हीच पाहा.
![Viral Video : समुद्र किनारी मस्ती करणं तरुणीच्या अंगलट, अचानक लाट आली अन्...; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा girl standing on shore was badly thrown by waves of sea video viral marathi news updates Viral Video : समुद्र किनारी मस्ती करणं तरुणीच्या अंगलट, अचानक लाट आली अन्...; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/da4b98f395f3aa199d182f8170c85bee1657851973_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Viral Video : पावसाळा सुरु झाला की अनेकजण निसर्गाची सफर सुरु करतात. पावसाळ्यात रमणीय ठिकाणी कधी डोंगरकपारीत तर कधी समुद्र किनारी लोक मजा करण्यासाठी जातात. बहुतेक जण यावेळी फोटो किंवा व्हिडीओ काढतात. आजकाल तर रिल्सची चलती आहे. रिल्स बनवण्याचं सध्या ट्रेंड आहे. अनेक वेळा लोक फोटो काढताना, व्हिडीओ किंवा रिल्स बनवताना स्वत:चा जीव धोक्यात घालताना पाहायला मिळतात. असे प्रयत्न अनेकांच्या जिव्हारी बेतल्याच्या बातम्याही आपण ऐकल्या आण पाहिल्या असती. तरीही अशा परिस्थितीत व्हिडीओ किंवा रिल्स बनवण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. असा धोकादायक प्रयत्न तुम्ही मुळीच करु नका. या व्हिडीओमध्ये एक तरुणी समुद्र किनारी रिल्स बनवताना दिसत आहे. पण तिचा हा प्रयत्न तिच्या अंगलट येतो. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ही तरुणी उसळलेल्या समुद्र किनाऱ्यावर लाटांसोबत रिल्स बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
Your "Life" is more important than your "Likes". pic.twitter.com/3XNjyirbwJ
— Dipanshu Kabra (@ipskabra) July 13, 2022
जोरदार लाट आली अन्...
या व्हिडीओमध्ये मागे खवळलेला समुद्र दिसत आहे. ही तरुणी किनाऱ्याच्या अगदी जवळ जाऊन रिल्स बनवत असताना जोरदार लाट येते आणि ही तरुणी लाटेच्या तडाख्यासह खाली पडते. यावेळी येथे रिल्स बनवणारी तरुणी एकटीच नाहीय, तर तिच्या मागेही इतर लोक फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसत आहेत.
IPS अधिकाऱ्यांनी व्हिडीओ केला ट्विट
हा व्हायरल झालेला हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबडा (IPS Dipanshu Kabra) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्या या व्हिडीओसोबत कॅप्शन दिलं आहे की, 'तुमचं आयुष्य ''लाईक्स''पेक्षा अधिक मोलाचं आहे.' या व्हिडीओ आतापर्यंत सुमारे दोन लाख जणांनी पाहिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)