Couple Fight : दोघातलं भांडण चव्हाट्यावर, मेट्रोतच सुरु हाणामारी, जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल
Couple Fight Video : सोशल मीडियावर एका कपलमध्ये जोरदार हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड एकामेकांना मारहाण करत भांडताना दिसत आहेत.
![Couple Fight : दोघातलं भांडण चव्हाट्यावर, मेट्रोतच सुरु हाणामारी, जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल couple fight in metro video viral on social media marathi news updates Couple Fight : दोघातलं भांडण चव्हाट्यावर, मेट्रोतच सुरु हाणामारी, जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/0603f2b51a1992cb21482d55462a5dfa1657775144_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fight In Metro : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येत नाही. नेटकरी अनेक मजेदार आणि भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करताना पाहायला मिळतात. कधी कधी काही वास्तववादी आणि वेगळे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एका जोडप्याचं भांडण चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक जोडप भांडताना दिसत आहे. बर यांच्यातील वाद फक्त भांडणावरच थांबत नाही, तर त्याचं रुपांतर चक्क हाणामारीमध्ये होते. या जोडप्यातील वाद इतका विकोपाला जातो, की बाचाबाची दरम्यान दोघंही एकमेकांवर हात उचलतात. या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांच्या कानाखाली मारताना दिसत आहेत.
गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला काढलं बुकलून, दिल्ली मेट्रोमधील व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/bO7BXnYFZ4
— Mandar (@mandar199325) July 13, 2022
दिल्ली मेट्रोतील जोडप्याच्या भांडणाचा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोमधील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड भांडताना दिसत आहेत. हे जोडपं आधी एकमेकांसोबत जोरजोरात भांडू लागलं. त्यानंतर तरुणी तरुणाच्या कानाखाली मारते. त्यानंतर तरुणही रागाच्या भरात तरुणीच्या कानाखाली मारतो. या दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ मेट्रोमध्येच असणाऱ्या एका व्यक्तीने शूट केल्याचं कळत आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हाययल
'Mandar' नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेक युजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तर हा व्हिडीओ शेअरही केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Trending : 'या' तरुणाच्या शरीरात गर्भाशय, 20 वर्षांपासून येते मासिक पाळी, डॉक्टरही हैराण
- Viral Video : 'आसमान से गिरे खजूर पे अटके'; पॅराशूटमधून चुकीच्या बिल्डिंगवर लँडींग, पुढे काय झालं? तुम्हीच पाहा चित्तथरारक व्हिडीओ
- Viral Video : स्कूटीवरून बॅक फ्लिप करण्याचा 'अप्सरे'चा प्रयत्न पुरता फसला, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)