(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jews Population: बाकी धर्मांप्रमाणे का नाही वाढली ज्यूंची लोकसंख्या? 'हे' आहे कारण
Jews Population: जगभरातील ज्यूंची लोकसंख्या ही इतर धर्मातील लोकांपेक्षा फार कमी आहे, यामागे बरीच कारणं सांगितली जातात.
Jews Population: इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) या अतिरेकी संघटनेदरम्यान सुरू असलेलं युद्ध तूर्तास संपताना दिसत नाही, आतापर्यंत या युद्धात दोन्ही बाजूंच्या 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये मृत्यूची ही मालिका सुरूच असून, इस्रायलने हमासला पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्धार केला आहे. इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान तिथे राहणार्या ज्यूंबद्दल देखील बरीच चर्चा आहे.
लोक ज्यूंबद्दल विविध गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म देखील म्हणतात. आता या सगळ्यात असा प्रश्न पडतो की, शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या ज्यू धर्माच्या लोकांची संख्या जगात इतकी कमी का आहे? तर जाणून घेऊया.
जगात ज्यूंची लोकसंख्या किती?
जगातील बहुतेक ज्यू इस्रायलमध्ये राहतात, येथील एकूण ज्यूंची संख्या सुमारे 70 लाख आहे, जर आपण इस्रायल सोडून इतर जगाबद्दल बोललो तर जगात 20 लाखांपेक्षा कमी ज्यू आहेत. म्हणजे संपूर्ण जगात दिल्लीच्या लोकसंख्येपेक्षा कमी ज्यू लोक राहतात. आता प्रश्न असा आहे की मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर धर्मांच्या तुलनेत ज्यूंची लोकसंख्या गेल्या अनेक दशकांत वाढली का नाही? तर यामागे काही कारणं आहेत, जी आपण जाणून घेऊया.
ज्यूंमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त
ज्यूंची लोकसंख्या कमी होण्याचं आणि झपाट्याने वाढत नसल्याचं एक प्रमुख कारण म्हणजे या समुदायाच्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण खूप जास्त असल्याचं दिसून आलं आहे. विविध अभ्यास आणि संशोधनातून ही बाब समोर आली, याशिवाय ज्यूंचा नरसंहार हेही त्यांची लोकसंख्या कमी असण्यामागचं कारण मानलं गेलं आहे.
ज्यूंच्या कमी लोकसंख्येमागे धार्मिक धर्मांतरावर विश्वास नसणं हे देखील एक कारण मानलं जातं. ज्यू कधीही धर्मांतरात सक्रिय नव्हते. काही अहवालांमध्ये असंही म्हटलं गेलं आहे की काही ज्यूंनी इतर धर्म स्वीकारले. रिपोर्टनुसार, गेल्या काही दशकांत ज्यूंची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
भारतात किती प्रकारचे ज्यू राहतात?
भारतातील ज्यू समुदाय प्रामुख्याने तीन भागात विभागलेला आहे. पश्चिम भारतातील बेने इस्रायली ज्यू प्रथम वर्गात येतात. पश्चिम बंगालचे बगदादी ज्यू दुसऱ्या क्रमांकावर आणि केरळचे कोचीन ज्यू तिसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय ईशान्य भारतातील बेने मेनाशे ज्यू आणि आंध्र प्रदेशातील बेने एफ्राइम ज्यू देखील येथे राहतात.
बेने एफ्राइम ज्यू स्वतःला तेलुगु ज्यू म्हणतात, कारण ते तेलुगू भाषा बोलतात. तर, भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये म्हणजे मणिपूर आणि मिझोराममध्ये राहणारे बनी मेनाशे ज्यू समुदायाचे लोक मानतात की, त्यांचे पूर्वज इस्रायलचे आहेत. म्हणजेच बघितलं तर हा समाज भारतात 5 भागात विभागलेला आहे.
हेही वाचा:
Facts: हिंदू धर्मापेक्षा किती वेगळा आहे ज्यू धर्म? 'अशा' प्रकारे करतात पूजा