Covid19 Test on Animals : फक्त माणसांवरच नाही विंचू आणि माशांचीही होतेय कोविड टेस्ट, व्हिडीओ व्हायरल
Corona Test on Animals : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विंचू, मासे आणि खेकड्यांची कोविड टेस्ट होताना दिसत आहे.
Viral Video : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. अद्यापही कोरोनाचा संसर्ग देशासह जगातही सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर कोविड टेस्टही (Covid19 Test) केल्या जात आहे. फक्त माणसांच्याच नाही तर प्राण्यांसह मासे आणि विंचू यांच्याही कोविड टेस्ट केल्या जात असल्याचं समोर आलं आहे. हो तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक व्हिडीओमध्ये विंचू, मासे आणि खेकडे यांची कोविड टेस्ट करताना पाहायला मिळतं आहे. तुमचा यावर विश्वास बसत नसला तर हा व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्हीही एकदा पाहाच.
हा व्हायरल झालेला व्हिडीओ चीनमधील आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा जोर पकडताना दिसत आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चीन सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून प्राण्यांसह आता विंचू, मासे आणि खेकडे यांचीही RT-PCR चाचणी केली जात आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असनू तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
Videos of pandemic medical workers giving live seafood PCR tests have gone viral on Chinese social media. pic.twitter.com/C7IJYE7Ses
— South China Morning Post (@SCMPNews) August 18, 2022
हाँगकाँगमधील इंग्रजी वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या ट्विटर अकाऊंटवरून हा कोविड टेस्टचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरील चर्चेचा विषय बनला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चीनी अधिकारी मासे, खेकडे यांच्या तोंडातील स्वॅब घेताना दिसत आहेत. ये खरं आहे.
का केली जातेय माशांची स्वॅब टेस्ट
एका रिपोर्टनुसार, जिमी मैरीटाइम महामारी नियंत्रण समितीच्या हवाल्यानं चीन सरकारने जुलै महिन्यात घोषणा केली होती की, मच्छीमारांना त्यांनी पकडलेल्या समुद्री जीवांची कोविड चाचणी करावी लागेल. हे सर्वांसाठी अनिवार्य असेल. समुद्री प्राणीही संसर्गाला कारणीभूत ठरू शकतात, अशी शक्यता असल्यानं चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
व्हिडीओ जोरदार व्हायरल
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत तीन लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. याशिवायअनेक युजर्स व्हिडीओ शेअर देखील करत आहेत.