Tinder : ज्या अॅपवर गर्लफ्रेंड शोधतात, त्या अॅपवर या पठ्ठ्यानं शोधल्या बहिणी; रक्षाबंधनच्यानिमित्तानं टिंडरचे मानले आभार
Tinder : मुंबईमधील एका व्यक्तीनं टिंडर (Tinder) या डेटिंग अॅपवर बहिणी शोधल्या आहेत.
Tinder : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन (Raksha Bandhan). या निमित्ताने बहिण भावाला राखी बांधते तर भाऊ बहिणीला छानसं गिफ्ट देतो. भाऊ बहिणीचा हा सण आज देशभरात साजरा केला जात आहे. बहिण-भावाच्या अतूट नात्याचा हा दिवस. सध्या मुंबईमधील (Mumbai) एका व्यक्तीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्यक्तीनं बहिण नसल्यानं रक्षाबंधन साजरा करण्यासाठी टिंडर (Tinder) या डेटिंग अॅपवर बहिणी शोधण्यास सुरुवात केली. या व्यक्तीला टिंडर अॅपवर दोन बहिणी देखील मिळाल्या. या व्यक्तीनं रेडिटवर एक पोस्ट शेअर करुन टिंडर अॅपचे आभार मानले आहेत.
टिंडर हे खरं तरं डेटिंग अॅप आहे. या अॅपवर राइट स्वाइप करुन लोक डेटिंग करतात. टिंडरचा वापर अनेक मुलं गर्लफ्रेंड शोधण्यासाठी करतात. पण मुंबईतील एका व्यक्तीनं या अॅपचा वापर चक्क बहिणी शोधण्यासाठी केला.
पोस्ट व्हायरल
पोस्टमध्ये त्या व्यक्तीनं लिहिलं, 'मला रक्षाबंधन या सणाला दर वर्षी एकटं असल्यासारखं वाटतं. मला बहिण नाहीये. मला कोणी राखी देखील बांधत नव्हतं आणि मी कोणाला गिफ्ट देखील देत नव्हतो. पण मी टिंडर अॅपच्या बायोमध्ये रक्षाबंधनच्या दोन आठवड्याच्या आधी लिहिलं की, मी रक्षाबंधनला बहिण शोधत आहे. त्यानंतर दोन मुली माझ्या बहिणी होण्यास तयार झाल्या. या वर्षी आम्ही तिघे एकत्र रक्षाबंधन हा सण साजरा करणार आहोत. तसेच मी त्यांना गिफ्ट देखील देणार आहे. मी यासाठी टिंडर या अॅपचे आभार मानतो.' सध्या या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. टिंडरचा असाही वापर केला जाऊ शकतो? असा सवाल काही नेटकरी विचारत आहेत.
पाहा पोस्ट:
रेडिटवरील या व्यक्तीच्या पोस्टवर अनेकांनी रिअॅक्शन्स दिल्या आहे. काही लोकांनी या व्यक्तीला शुभेच्छा दिल्या तर काहींनी याला ट्रोल केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: