Trending Wedding Video: भर लग्नमंडपातच वधू-वराचे भांडण, मारामारी! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Trending Wedding Video: लग्नाला आलेल्या पाहुण्यांसोबत वधू-वरांची मंडपातील हे भांडण वधू-वरांच्या आयुष्यभर स्मरणात राहील. त्याचे कारणही तसेच आहे.
Trending Wedding Video: लग्न हा मुलगा आणि मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस असतो, हा दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी त्याला खास बनवण्यासाठी बरीच तयारी केली जाते. व्हिडीओग्राफर (Videographer) आणि फोटोग्राफर (Photographer) हे विवाह सोहळ्यातील खास क्षण त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असतात. लग्न सोहळ्यातील अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) पाहिले असतील, अशातच लग्नाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लग्नाला आलेल्या पाहुण्यांसोबत वधू-वरांची मंडपातील हे भांडण (Viral Video Of Groom & Bride) वधू-वरांच्या आयुष्यभर स्मरणात राहील. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक जोडपे त्यांच्या लग्नाच्या दिवशी मंडपात एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.
View this post on Instagram
या व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ
या विवाहाची व्हिडिओ त्याच्या मजेदार आणि नाट्यमय ट्विस्टमुळे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ज्यामुळे नेटिझन्सचे खूप मनोरंजन होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सही हैराण झाले आहेत. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, त्यावर नेटकऱ्यांचे कमेंट्स येत आहेत.
व्हिडिओवर भरपूर कमेंट्स
व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट होताच नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मजेशीर कमेंट्स टाकल्या आहेत.
ती बुलेट चालवताना.. व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती
Royal Enfield नावाची बुलेट चालवणाऱ्या या नवविवाहीत वधुच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. सुजीत एम सीनिक या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आत्तापर्यंत 1.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच एक लाखांपेक्षा जास्त युझर्सनं या व्हिडीओला लाइक केलं आहे. यापूर्वी एका नववधुचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती बुलेट चालवताना दिसली. तर बुलेटच्या बॅकसिटवर नवरदेव बसलेला दिसला.
View this post on Instagram
इतर संबंधित बातम्या
- Fetus Inside Egyptian Mummy : 2000 वर्ष जुन्या इजिप्शियन ममीच्या पोटात 28 महिन्यांचा गर्भ, आतापर्यंत कसा राहिला सुरक्षित?
- Egyptian Mummy : CT scan च्या मदतीने तीन हजार वर्षांपूर्वीच्या 'ममी'चं गूढ उलघडणार, इटलीतील प्रयोग